आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

होमिओपॅथीने तेजस्विनीचे जीवनच झाले तेजस्वी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - ११महिन्यांच्या तेजस्विनीला अचानक दुर्धर आजार जडला. आईवडील हादरून गेले. मोठ-मोठ्या रुग्णालयांत उपचार केले. मात्र, फायदा झाला नाही. तेजस्विनी बरी होणार नाही, असा फीडबॅक डॉक्टरांनी दिला. मात्र, शेवटचा उपाय म्हणून तेजस्विनीचे वडील गोपाळ गावंडे यांना कुणीतरी होमिओपॅथीचा रस्ता दाखवला अन् तिला होमिओपॅथी डॉक्टरांकडे दाखल करण्यात आले. पाहतात तर काय, काहीच दिवसांत तेजस्विनीमध्ये सुधारणा होऊ लागली आणि ती असाध्य रोगातून बाहेर आली तिचे आयुष्यच तेजोमय झाले. आज ती पहिल्या वर्गात शिकत असून, पूर्णपणे बरी झाली आहे.
तेजस्विनी गोपाळ गावंडे रा. रामगाव, असे या चिमुकलीचे नाव आहे. आज ती आठ वर्षांची आहे. अकोल्यातील एका नामांकित इंग्रजी शाळेत ती शिक्षण घेत आहे. ११ महिन्यांची होती तेव्हा ती कोमात गेली. तिला इपिलेस्पी पायोजेनिक मेनींगजाइटिस, हायड्रोसिप्यालस, सबड्युरल अॅनेमिया, असायटीस क्रॉनिक ओस्टिओमायटीस एवढ्या सगळ्या आजारांनी ग्रासले होते. एवढासा जीव आणि एवढे सगळे आजार यामुळे तिचे आईवडील चिंताग्रस्त झाले. काय करावे आणि का करू नये, अशी त्यांची अवस्था झाली. त्यांनी शहरातील सर्व मोठ्या रुग्णालयांत मुलीला दाखल केले. पण, काही फायदा झाला नाही. नंतर त्यांनी नागपूरला पुढील उपचारार्थ नेले, तेथेही काही सुधारणा झाली नाही. त्यानंतर त्यांनी अकोला येथीलच होमिओपॅथीमध्ये तज्ज्ञ असलेले डॉ. सहदेव वानखडे यांच्याकडे मुलीला दाखल केले. त्यांनी तिच्यावर उपचार सुरू केले.
मात्र, डॉ. वानखडे यांनी तेजस्विनीला या आजारातून होमिओपॅथी औषधोपचाराद्वारे पूर्णपणे बरे केले. या असाध्य आजारातून बाहेर आल्याने तेजस्विनीला तर जीवनाचाच पुरस्कार मिळाला.
तेजस्विनीसोबत डॉ. वानखडे.
डॉ. वानखडेंची दखल जागतिक स्तरावर
डॉ.सहदेव वानखडे यांनी तेजस्विनीसारख्या अत्यंत जटिल आजारातून आणखी तीन रुग्णांना बरे केले. त्याची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली. सोफिया भाभा ऑडोटोरियम मुंबई येथे २५ जानेवारी रोजी प्रीडिक्टिव्ह होमिओपॅथीचे जनक डॉ. प्रफुल्ल विजयकर प्रीडिक्टिव्ह होमिओपॅथी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने होमिओपॅथिक कॉम्पिटिशन आयोजित केली होती. या कॉन्फरन्सला विविध देशांतील होमिओपॅथिक डॉक्टर्स आले होते. त्यामध्ये तीन डॉक्टरांना अवॉर्ड घोषित करण्यात आले. त्यामध्ये डॉ. सहदेव वानखडे यांना पॅथोलॉजीचे सायंटिस्ट डॉ. बोनिंग हाउसन अवॉर्डने समान्मित करण्यात आले. डॉ. वानखडे हे होमिओपॅथी बॅचच्या १९९८-९९ चे राज्यातून पहिले मेरिट होते.