आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णालयातील सुरक्षा रक्षक वेतनाविनाच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खामगाव - येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना मागील सात महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
रुग्णालयातील रुग्णांचे कर्मचाऱ्यांचे संरक्षण व्हावे, रुग्णांच्या सोबत असलेल्या नागरिकांना शिस्त लागावी, या दृष्टीने येथील उप जिल्हा रुग्णालयात मेस्को कंपनीच्या माध्यमातून नऊ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. ते त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे बजावताना दिसत आहेत. मात्र, या सुरक्षा रक्षकांचे तब्बल तर सात महिन्यांपासूनचे वेतन थकीत असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. वेतन मिळावे यासाठी सुरक्षा रक्षकांनी मेस्को कंपनीच्या व्यवस्थापकांकडे अनेकदा मागणी आणि पाठपुरावा केला. मात्र, दरवेळी चालू महिन्यात वेतन दिले जाईल, असे सांगण्यात येत आहे. सात महिन्यांपासून त्यांना केवळ आश्वासनच दिले जात आहे.

कंपनीने पाठवले पत्र
वेतनाचीबाब मेस्को कंपनीने आता गांभीर्याने घेतली आहे. कंपनीचे पर्यवेक्षक चिमकर यांनी येथील शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश सिरसाट यांना २४ जून रोजी पत्र पाठवले आहे. थकीत रक्कम एक जुलैपर्यंत मिळाल्यास सुरक्षा रक्षक काढून टाकण्यात येतील, असे या पत्रात नमूद आहे.

संपूर्ण राज्यात अशीच परिस्थिती
सुरक्षारक्षकांच्या वेतनाची समस्या केवळ खामगाव येथील रुग्णालयातच नाही. ही परिस्थिती संपूर्ण राज्यात आहे. शासनाकडून मिळणारा निधी अद्यापही मिळाला नाही. तो निधी मिळताच सुरक्षा रक्षक पुरवण्याचा कंत्राट घेणाऱ्या मेस्को कंपनीला ठरवून दिलेले पैसे देण्यात येतील. याबाबत आरोग्य विभागाचे संचालक उपसंचालकांना कळवण्यात आले आहे. डॉ.सुरेश सिरसाट, वैद्यकीयअधीक्षक, उप जिल्हा रुग्णालय, खामगाव.