Home | Maharashtra | Vidarva | Akola | hurry for purchase lic policy in akola

अकोल्‍यात एलआयसीची पॉलिसी काढण्यास लगबग

प्रतिनिधी | Update - Sep 30, 2013, 11:48 AM IST

आयआरडीए अर्थात विमा कंपन्यांवर नियंत्रण ठेवणार्‍या प्राधिकरणाने विमा क्षेत्रातील सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतला आह़े .

 • hurry for purchase lic policy in akola

  अकोला- एलआयसीच्या विमा पॉलिसी 1 ऑक्टोबरपासून नवीन स्वरूपात येणार आहे. 1 ऑक्टोबरनंतर काढलेल्या पॉलिसीला सेवा कर लागण्यासोबतच बोनस कमी होणार आहे. त्यामुळे 30 सप्टेंबरला एलआयसी विमा पॉलिसी काढण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.

  आयआरडीए अर्थात विमा कंपन्यांवर नियंत्रण ठेवणार्‍या प्राधिकरणाने विमा क्षेत्रातील सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतला आह़े त्यातून एलआयसीने आपल्या पॉलिसीमध्ये बदल केले आहेत़ जागतिकीकरणातील धोरणानुसार विमा क्षेत्रात सुधारणा केल्या जात आहेत़ सध्या एलआयसीच्या 52 योजना बाजारात आहेत़ नवजात बालकापासून 85 वर्षांच्या वृद्धापर्यंत सर्वांना विमा उतरवता येणार्‍या या योजना आहेत. कमी प्रीमियम आणि बोनस व चांगला परतावा अशा एलआयसीच्या योजना होत्या़ 1 ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने नव्या योजना दाखल होणार असून, एलआयसी आणि खासगी कंपन्यांच्या सगळ्या योजना आता सारख्याच राहतील. शिवाय, बोनस बंद होण्याची शक्यता अधिक आह़े या बोनसवरच एलआयसीच्या पॉलिसींवर ग्राहकांना अतिरिक्त आर्थिक लाभ मिळत होता़ यापुढे 1 ऑक्टोबरनंतरच्या पॉलिसींवर बोनस मिळण्याची शक्यता नसली तरी, त्याआधी घेतलेल्या पॉलिसींना बोनस मिळणार आह़े

  सप्टेंबरमध्ये चांगला व्यवसाय
  विमा पॉलिसीमध्ये व्यापक बदल होत आहेत. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात चांगला व्यवसाय झाला आहे. आता विमाधारकांना सेवाकरही लागणार आहे. विमाधारकांच्या फायद्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत जास्तीत जास्त पॉलिसी काढण्याचा प्रयत्न केल्या जात आहे.

  अतिरिक्त आर्थिक बोजा
  आता सेवाकर लागणार असल्याने प्रीमियम अधिक सेवाकराची रक्कम ग्राहकाला भरावी लागणार आहे. त्यामुळे विमाधारकांना अतिरिक्त आर्थिक बोजा सहन करावा लागेल. तो टाळण्यासाठी 1 ऑक्टोबरपूर्वी विमा काढण्याकडे नागरिकांचा कल आहे.

Trending