आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सासरच्यांनी पैशांसाठी विवाहितेस पेटवले, पतीसह चार जणांना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर- पैशासाठी सुनेचा मानसिक शारीरिक छळ करून तिला रॉकेल टाकून पेटवून ठार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मूर्तिजापूर पोलिसांनी सासरकडील मंडळींविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली आहे.
गोयनकानगरातील रहिवासी राजेश श्रीपत गोकणे, आई, वडील, नणंद यांनी लग्नापासनूच या विवाहितेचा पैशांसाठी शारीरिक मानसिक छळ केला. २५ वर्षीय राजेशचा विवाह चार वर्षांपूर्वी सोनाली हिच्यासोबत झाला होता. लग्नानंतर सासरकडील मंडळीने सोनालीकडे पैशांसाठी तगादा लावला होता. अखेर २२ मे रोजी या मंडळीने सोनालीस रॉकेल ओतून पेटवून दिले. यामध्ये ती ६५ टक्के भाजली. सोबतच सोनालीचा दोन वर्षांचा मुलगा आयुष हासुद्धा भाजला.
गंभीर अवस्थेत सोनालीला अकोल्यातील ओझाेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी २४ मे रोजी मृत्यूशी झंुज देत असलेल्या साेनालीचे बयाण नोंदवले. सासरकडील मंडळीने पैशांसाठी अंगावर रॉकेल ओतून पेटवल्याने तिने बयाणात सांगितले. विवाहितेच्या बयाणावरून मूर्तिजापूर पोलिसांनी विविध गुन्हे नाेंदवून पीडितेचा पती राजेश गोकणे, सासरा श्रीपद गोकणे, सासू धृपदाबाई गोकणे, नणंद रत्ना गायकवाड यांना अटक केली. पुढील तपास ठाणेदार विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्नात पोलिस उपनिरीक्षक दिलीप गवई, प्रमोद अटाळकर करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...