आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पत्नीच्या डोक्यात पाटा घालणाऱ्या पतीची पोलिस कोठडीत रवानगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- लग्नाला गेलेले पती-पत्नी नातेवाइकांकडे मुक्कामाला थांबले. रात्री वाजताच्या सुमारास पतीने पत्नीच्या डोक्यात मसाला वाटण्याचा पाटा घातला. त्यात पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना ३० मे रोजी घडली होती. याप्रकरणी रामदासपेठ पोलिस ठाण्यात जून रोजी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. शुक्रवारी पतीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पतीची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे.
अकोट येथील शेख सलीम शेख मेहबूब आणि त्याची पत्नी नाजिया हे दोघे एका नातेवाइकाकडे तारफैल येथे लग्नाला आले होते. त्यानंतर रात्री उशिरा ते मुख्त्यार अहमद शेख अब्दुला याच्या घरी मुक्कामासाठी गेले. त्याच्या घरी रात्री उशिरा झोपल्यानंतर शेख सलीम शेख मेहबूब याने पत्नी झोपली असताना रात्री वाजता तिच्या डोक्यात मसाला वाटण्याचा पाटा टाकला. त्यात ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले होते.
मात्र, या घटनेची तक्रार रामदासपेठ पोलिस ठाण्यात जूनला दुपारी वाजता देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी मुख्त्यार शेख अब्दुला यांच्या तक्रारीवरून भादंवि ३२६ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर रात्री उशिरा आरोपी पती शेख सलीम शेख मेहबूब याला अटक केली. शनिवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. सरकार पक्षाच्या वतीने आरोपीची सात दिवसांची पोलिस कोठडी मागण्यात आली. मात्र, आरोपीचे वकील अॅड. केशव एच. गिरी यांनी त्याला विरोध करत घटना जर ३० तारखेला घडली असेल, आणि गुन्हा जूनला दाखल झाला असेल, त्यातही जखमी महिलेचे सर्वोपचार रुग्णालयातील कागदपत्रे किंवा नागपूर येथील रुग्णालयातील कुठलीही कागदपत्रे सादर कशी केली नाहीत, असा मुद्दा उपस्थित करून पोलिसांनी कोणत्या आधारावर भादंवि ३२६ अन्वये गुन्हा दाखल केला, असे प्रश्न न्यायालयात उपस्थित केले. त्यावरून न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.