आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूबंदी आंदोलनाला पाठिंबा देणार - अण्णा हजारे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोले - दारूबंदी चेकाम अवघड असले, तरी अशक्य नाही हे राज्यात ठिकठिकाणी झालेल्या दारूबंदीने दाखवून दिले आहे. दारू हे सामाजिक प्रदूषण सामाजिक तंट्याचे मूळ असल्याने राज्यातील दारूबंदी आंदोलनाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू, अशी ग्वाही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली.

साप्ताहिक साधना दारूबंदी विशेषांकाचे प्रकाशन हजारे यांच्या हस्ते राळेगणसिद्धी येथील पद्मावती मंदिरात झाले. त्यावेळी ते बोलत होते. या विशेषांकाचे संपादन हेरंब कुलकर्णी यांनी केले. याप्रसंगी चंद्रपूरला दारूबंदी आंदोलन यशस्वी करणारे कार्यकर्ते पारोमिता गोस्वामी, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या मुक्ता पुणतांबेकर, दारूबंदी आंदोलनाचे कार्यकर्ते वसुधा सरदार, प्रेमलता सोनुने, बालाजी कोपलवार आदी उपस्थित होते. पुणतांबेकर यांनी दारूबंदी चळवळीत व्यसनमुक्तीचे महत्त्व सांगत व्यसन लागण्याचे वय खूप कमी होत आहे. याबाबत चिंता व्यक्त केली. या कार्यक्रमाला बुलढाणा येथील प्रेमलता सोनुने, रवींद्र धनक, अरुण जाधव, बाळासाहेब मालुंजकर (अकोले), बाबा सोनवणे आदी उपस्थित होते. आभार अशोक सब्बन यांनी मानले.

बदलांसाठी लढावे
राळेगणसिद्धीयेथे राज्यातील १० जिल्ह्यांतील दारूबंदी चळवळीत काम केलेले कार्यकर्ते एकत्र आले. त्यांचे नेटवर्क यानिमित्त स्थापन होत अाहे. "नगर जिल्हा दारूबंदी’ची सुरुवात आजच्या बैठकीत होत आहे. दारूबंदी आंदोलनातील कार्यकर्त्यांचे चारित्र्य हेच खरे आंदोलनाचे सामर्थ्य अाहे. धोरणात्मक बदलांसाठी कार्यकर्त्यांनी लढले पाहिजे, अशी अपेक्षा हजारे यांनी व्यक्त केली.