आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विनोदला न्याय मिळवून देणारच, खा. राजीव सातव यांचे प्रतिपादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेल्हारा- वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे युवा शेतकरी विनोद खारोडेला आत्महत्या करावी लागली. याला शासनाचे शेतकरीविरोधी धोरण जबाबदार असून, यापुढे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये विनोदला न्याय मिळावा, याकरिता लोकसभा विधानसभेत हा मुद्दा उचलून धरणार असल्याचे हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी तळेगाव बाजार येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
विनोद खारोडे या शेतकऱ्याने वीज वितरण कंपनीच्या हिवरखेड येथील कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्याकरिता खासदार सातव हे शनिवारी तळेगाव बाजार येथे आले हाेते. त्यांनी विनोदच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत ५१ हजारांची मदत दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. आत्महत्याग्रस्ताच्या परिवारातील सदस्याला शासकीय नोकरीत समाविष्ट करण्याची तसेच भ्रष्ट अभियंत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांच्यासोबत काँग्रेसचे अकोला महानगर अध्यक्ष मदन भरगड, युथ काँग्रेसचे अध्यक्ष बद्रुजमा, महेश गणगणे, संजय बोडखे, साजीदखाँ पठाण, प्रकाश तायडे, श्याम भोपळे, मनीष भांबुरकर, संजय वानखडे, मो. इद्रिस, किशोर खारोडे, प्रवीण खारोडे, सुभाष भड, जाकीरभाई उपस्थित होते.
"त्या' अभियंत्यांना अटक करावी
तळेगावबाजार येथील पत्रपरिषदेनंतर खासदार राजीव सातव यांनी हिवरखेड पोलिस स्टेशनला भेट देत विनोदच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सात दिवसांमध्ये अटक करण्याचा अल्टिमेटम दिला. त्या अभियंत्यांना अटक केल्यास युवक काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, असा इशाराही देण्यात आला.