आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएमए सामाजिक बांधीलकी जपणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- नूतन इंडियन मेडिकल असोसिएशनची (आयएमए) निवडण्यात आलेली कार्यकारिणी आपल्या लौकिकाला साजेशी अशी सामाजिक कार्याला असलेली बांधीलकी जपणार असून, शिक्षण, आरोग्य क्षेत्रात उपक्रम राबवत सेवा देणार आहे, असे प्रतिपादन आयएमए अकोल्याचे नूतन अध्यक्ष डॉ. विजय खेर्डे यांनी येथे केले. येथील आयएमए हॉलमध्ये सन 2014-15 साठी निवडण्यात आलेल्या नूतन कार्यकारिणीच्या आयोजित पदग्रहण सोहळ्यात ज्येष्ठ डॉक्टर आर. एन. भांबुरकर यांच्या हस्ते अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ते होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे मावळते अध्यक्ष डॉ. प्रकाश अहेर होते. या प्रसंगी नूतन मानद सचिव डॉ. राजेंद्र सोनोने, डॉ. सत्येन मंत्री आदी उपस्थित होते. डॉ. विजय खेर्डे म्हणाले, नूतन कार्यकारिणी आपली सामाजिक बांधीलकी जपणार आहे. येत्या वर्षात शैक्षणिक, समाजोपयोगी, आरोग्यविषयक उपक्रम राबवण्याची घोषणा त्यांनी केली. आयएमएच्या नवीन थिम्याटिक आणि सायक्लोन क्लबच्या लोगोंचे अनावरण डॉ. विजय खेर्डे आणि डॉ. विनायक देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
आयएमएच्या वेबसाइटचीसुद्धा घोषणा करून डॉ. हरीश अग्रवाल यांच्या शुभहस्ते अनावरण करण्यात आले. या वेळी नुकतेच ज्येष्ठ धन्वंतरी नानासाहेब चौधरी यांचे प्रोफाइल साइटवर अपलोड करण्यात आले. नूतन उपाध्यक्ष डॉ. के.के.अग्रवाल यांच्या हस्ते नवीन कार्यकारिणी फलकाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला आयएमएचे सदस्य परिवारासोबत उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणीत कार्यकारी सदस्य डॉ.प्रकाश अहेर, डॉ. विजय राठोड, डॉ.अविनाश पाटील, डॉ. रणजित पाटील, डॉ.प्रद्योत गर्ग, डॉ.उमेश गडपाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सल्लागार समितीत डॉ.एस.एस.काळे, डॉ.एस.एस.भागडे, डॉ.राम शिंदे, डॉ.सुनील मापारी, डॉ. सुनील महानकर, संयुक्त सल्लागार म्हणून डॉ.किशोर पाचकोर, खजिनदार म्हणून डॉ.अंजली सोनोने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या कार्यकारणीने नवे उपक्रम हाती घ्यावे.