आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेला आयएएस आयुक्त देण्याची गरज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - महापालिकेचे आयुक्त दीपक चौधरी यांची बदली झाल्यानंतर अकोला महापालिकेत राज्य शासनाने आयएएस आयुक्त पाठवावा, अशी मागणी नागरिकांद्वारे व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अकोला शहराचे पालकत्व घेण्याचे वचन दिले होते. ते वचन पूर्ण करण्यासाठी अकोला महापालिकेतील राजकारण आणि शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे, गटारींची झालेली दुरावस्था महापालिकेतील विविध विभागांत असलेला गैरकारभार, शहरातील वाढत्या नागरी समस्या, कचरा, साफसफाई, कर्मचार्‍यांचे थकित वेतन हे सर्व मुद्दे मार्गी लावण्यास राज्य शासनाने येथे आयएएस अधिकारी देण्याची गरज जनसामान्यातून व्यक्त होत आहे.

दहावे आयुक्त कोण?
स्वतंत्र प्रभार असलेले दहावे आयुक्त कोण, असा प्रश्न पडला आहे. मनपा स्थापनेनंतर लक्ष्मीकांत देशमुख, राजन भवरे, गजानन घाटे, संजय काकडे, चंद्रशेखर रोकडे, डी. ए. पठाण, जी. एन. कुर्वे, बिपीन शर्मा व दीपक चौधरी यांच्याकडे स्वतंत्र प्रभाराचे आयुक्त पद होते. अनेक प्रभारी अधिकारी आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यामुळे आता दहावे स्वतंत्र प्रभाराचे आयुक्त कोण, असा प्रश्न चर्चिल्या जात आहे.