आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयसीएआय : म्युझियमचे उद्घाटन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या शाखेकडून ‘अकाउंटंसी म्युझियम ऑफ इंडिया’चे उद्घाटन करण्यात आले. म्युझियमचे उद्घाटन आयकर विभागाचे सहआयुक्त बी.के. मिस्त्री यांच्या हस्ते झाले.
उद्घाटनप्रसंगी शाखेचे अध्यक्ष संजय कोटक, सचिव विक्रम गोलेच्छा, कोषाध्यक्ष पंकज अग्रवाल, सदस्य रमेश चौधरी,मिथुन टेकाडे व परिसरातील चार्टर्ड अकाउंटंट्स प्रामुख्याने उपस्थित होते. म्युझियममध्ये अकाउंटंसीचा इतिहास नोंद केलेला आहे. या सुवर्ण संधीचा लाभ अकोलेकरांना व्हावा म्हणून सोमवार, 10 ते 15 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत म्युझियम सुरू राहील. हे म्युझियम ‘आयसीएआय भवन’, तोष्णीवाल ले-आउट मूर्तिजापूर रोड, अकोला येथे सुरू राहील. त्याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन शाखा सचिव विक्रम गोलेच्छा यांनी केले आहे.