आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एड्सग्रस्तांमध्ये क्षयरोगाचे प्रमाण वाढले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- एड्स आणि क्षयरोग (टी. बी.) हे खरं तर दोन वेगवेगळे आजार आहेत. परंतु, गत काही वर्षांत एड्सग्रस्तांना क्षयरोग होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. हे प्रमाण 60 टक्के झाल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली. आधीच सामाजिक बहिष्कार करत असलेला एड्सग्रस्त, क्षयरोग झाल्याने मानसिकदृष्ट्या पोखरला जातो. त्याला दोन्ही आजारांवर उपचार करावे लागतात. आरोग्य विभागाने दोन्ही आजारांच्या रुग्णांवर उपचाराकरिता प्रभावी पावले उचलली आहेत. एचआयव्ही रुग्णांकरिता विविध पातळ्यांवर उर्वरित.भावीपणे केले जात असल्यामुळे 1985 पासून निष्पन्न झालेले रुग्ण अद्यापही जीवनाचा आनंद घेत असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. दर्शन जनईकर यांनी दिली. एड्स निर्मूलनाकरिता राज्य एड्स नियंत्रण संस्थेमार्फत जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक पथक प्रभावीपणे कार्य करत आहे. संशयित एड्स रुग्णाच्या शक्तीचे सीडी चार तपासणी अंतर्गत मोजमाप केले जाते. हे मोजमाप 350 सेल्सच्या कमी असेल, तर उपचारांना प्रारंभ होतो. अकोल्यात एड्सवर पहिल्या पातळीचेच उपचार केले जातात. त्याअंतर्गत नॉन न्युक्लिओ साइड्स रिव्हर्स ट्रामीटेज इनबीटर, प्रोटीएज इनबिटर व न्यूक्लिओ साइड्स इनबिटर या औषधांचे मिर्शण रुग्णाला दिले जाते. दुसर्‍या व नंतरच्या पातळीचे उपचार नागपूर, मुंबईसारख्या मोठय़ा ठिकाणी कामे केली जातात, अशी माहिती त्यांनी दिली.
तर क्षयरोगाच्या संशयित रुग्णाच्या बेडक्याची तपासणी व एक्स रे नंतर उपचार करण्यात येतात. सवरेपचार रुग्णालयात क्षयरोग उपचाराकरिता दोन कक्ष आहेत. या रोगावर अकोल्यात डॉट्स व डॉट्स प्लस थेरपीनुसार उपचार करण्यात येतात. या रोगाच्या टी. बी. 1 नुसार सहा महिने उपचार करण्यात येतात, तर टी. बी. दोन नुसार आठ महिने उपचार केले जातात. जर आठ महिन्यांच्या उपचारानंतरही बेडक्यात जंतू आढळले, तर त्या रोग्यास मल्ट्री ड्रग रेजिस्टन्स टी. बी. झाल्याचे निदान केले जाते. क्षयरोगावर शासकीय रुग्णालयात मोफत उपचार केले जातात, तर खासगी रुग्णालयात डॉट्सअंतर्गत चार ते पाच हजार व डॉट्स प्लस अंतर्गत तब्बल अडीच लाख रुपये खर्च येतो.
अशा रुग्णांची सर्वाधिक काळजी : एड्स व क्षयरोग असा दुहेरी आजार असलेल्या रुग्णांची सवरेपचार रुग्णालयात सर्वाधिक काळजी घेतली जाते, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिली आहे.
प्रभावीपणे केले जात असल्यामुळे 1985 पासून निष्पन्न झालेले रुग्ण अद्यापही जीवनाचा आनंद घेत असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. दर्शन जनईकर यांनी दिली. एड्स निर्मूलनाकरिता राज्य एड्स नियंत्रण संस्थेमार्फत जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक पथक प्रभावीपणे कार्य करत आहे. संशयित एड्स रुग्णाच्या शक्तीचे सीडी चार तपासणी अंतर्गत मोजमाप केले जाते. हे मोजमाप 350 सेल्सच्या कमी असेल, तर उपचारांना प्रारंभ होतो. अकोल्यात एड्सवर पहिल्या पातळीचेच उपचार केले जातात. त्याअंतर्गत नॉन न्युक्लिओ साइड्स रिव्हर्स ट्रामीटेज इनबीटर, प्रोटीएज इनबिटर व न्यूक्लिओ साइड्स इनबिटर या औषधांचे मिर्शण रुग्णाला दिले जाते. दुसर्‍या व नंतरच्या पातळीचे उपचार नागपूर, मुंबईसारख्या मोठय़ा ठिकाणी कामे केली जातात, अशी माहिती त्यांनी दिली.
तर क्षयरोगाच्या संशयित रुग्णाच्या बेडक्याची तपासणी व एक्स रे नंतर उपचार करण्यात येतात. सवरेपचार रुग्णालयात क्षयरोग उपचाराकरिता दोन कक्ष आहेत. या रोगावर अकोल्यात डॉट्स व डॉट्स प्लस थेरपीनुसार उपचार करण्यात येतात. या रोगाच्या टी. बी. 1 नुसार सहा महिने उपचार करण्यात येतात, तर टी. बी. दोन नुसार आठ महिने उपचार केले जातात. जर आठ महिन्यांच्या उपचारानंतरही बेडक्यात जंतू आढळले, तर त्या रोग्यास मल्ट्री ड्रग रेजिस्टन्स टी. बी. झाल्याचे निदान केले जाते. त्याची तपासणी मात्र नागपूरला होते. क्षयरोगावर शासकीय रुग्णालयात मोफत उपचार केले जातात, तर खासगी रुग्णालयात डॉट्सअंतर्गत चार ते पाच हजार व डॉट्स प्लस अंतर्गत तब्बल अडीच लाख रुपये खर्च येतो.
अशा रुग्णांची सर्वाधिक काळजी
एड्स व क्षयरोग असा दुहेरी आजार असलेल्या रुग्णांची सवरेपचार रुग्णालयात सर्वाधिक काळजी घेतली जाते. असे रुग्ण मानसिकदृष्ट्या सक्षम राहावे म्हणून विशेष प्रयत्न केले जातात, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिली आहे.