आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वेच्या पायरीवर बसणे पडेल महागात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- रेल्वेगाड्यांमध्ये वाढलेली गर्दी पाहता अनेक प्रवासी डब्याच्या पायऱ्यांवर बसतात. मात्र, गर्दीमुळे रेटारेटी होऊन अथवा धावपळीत हा प्रकार थेट जीवावर बेतणारा ठरू शकतो. यावर प्रतिबंध बसावा, यासाठी रेल्वे सुरक्षा बलाचे जवान डब्याच्या पायरीवर बसणाऱ्यांवर कारवाई करणार आहेत.
सर्वच रेल्वेगाड्यांना खच्चून गर्दी आहे. प्रवासी गाडी सुटण्याच्या वेळी डब्याच्या पायरीवर बसतात किंवा दरवाजाजवळ दाटीवाटीने उभे राहतात. यावर उपाययोजना म्हणून रेल्वे सुरक्षा बल विशेष मोहीम राबवत आहे. जे प्रवासी डब्याच्या पायरीवर बसून अथवा उभे राहून प्रवास करतील, त्यांच्यावर रेल्वे अॅक्टनुसार कारवाई करण्यात येईल. अनेक वेळा गाडीमध्ये जागा असूनही बरेचसे प्रवासी दरवाजामध्ये उभे राहतात, तर काही जण पायऱ्यांवर बसून प्रवास करतात. कित्येक वेळा गाडी वेगात असताना ती जर फलाटावरून जात असेल आणि पाय पायऱ्यांवर असतील तर अनेक वेळा पाय ठेचण्याच्या घटना घडलेल्या आहेत, तर कित्येक वेळा तोल जाऊन प्रवासी खाली पडतात.
अशा घटना रेल्वेत दररोजच घडत असल्यामुळे आरपीएफ आयुक्त चंद्र मोहन मिश्र यांनी याबाबत कठोर पावले उचलली आहेत. त्यांनी भुसावळ विभागातील सर्व आरपीएफला आदेश दिले आहेत. त्यामुळे अशा प्रवाशांवर कारवाई होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...