आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • If You Don't Mind, Deputy Commissioner Asked Corporators

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तो आपको कोई दिक्कत, उपायुक्तांचा दोन नगरसेवकांना थेट सवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - टिनशेडातवास्तव्य नसताना इमला पद्धतीचा कर भरणा-या मालमत्ताधारकांना उपायुक्त माधुरी मडावी यांनी नोटीस धाडल्याने इमलाधारकांमध्ये एकच खळबळ उडाली. फेब्रुवारीला या अनुषंगानेच चर्चा करायला (जाब विचारायला) आलेल्या दोन नगरसेवकांना उपायुक्त माधुरी मडावींनी महसूल बढा तो आपको कोई दिक्कत है क्या? असा थेट सवाल केला. या अनपेक्षित प्रतिप्रश्नांमुळे या दोन्ही नगरसेवकांची मात्र, चांगलीच पंचाईत झाली आणि त्यांनी काढता पाय घेतला.

मनपा क्षेत्रात काही भागांत स्वातंत्र्यकाळापासून इमला पद्धतीने कर आकारणी केली जाते. त्या वेळी टिनशेड अथवा झोपडीत राहणा-या नागरिकांकडून नाममात्र कराची आकारणी केली जात असे. पुढे कालांतराने या झोपडपट्टीचा काँक्रीटच्या जंगलात बदल झाला. जीवनमान उंचावल्यामुळेच हा बदल झाला. टिनशेडची जागा बंगल्यांनी घेतली तरी करात मात्र, वाढ झाली नाही. परिणामी, गेल्या अनेक वर्षांपासून मनपाच्या महसुलात घट झाली, तर दुसरीकडे मनपाच्या सुविधांचा वापर मात्र सुरू आहे. विशेष म्हणजे, ईमला पद्धतीने कराचा भरणा करणा-यांची संख्या हजारोंची आहे. या ईमला पद्धतीमुळे मनपाचे कोट्यवधी रुपयांचे मनपाचे नुकसान होत असल्याने या पूर्वीही प्रशासनाने ही पद्धत बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. परंतु, प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही. उपायुक्त माधुरी मडावी यांनी ईमला पद्धतीने कराचा भरणा करणा-या नागरिकांना थेट कागदपत्रांची मागणी केली. यात बांधकामाचा मंजूर नकाशाचाही समावेश आहे. या नोटीस धडकल्याने या भागात एकच खळबळ उडाली.

या अनुषंगानेच दोन नगरसेवक उपायुक्त माधुरी मडावी यांना भेटण्यासाठी गेले. उपायुक्तांनी केवळ कागदपत्रेच मागितली असल्याची बाब स्पष्ट केली. तसेच अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही, असा खुलासाही केला. परंतु, नगरसेवकांचे प्रश्न सुरूच राहिले. ही बाब लक्षात घेऊन उपायुक्त माधुरी मडावी यांनी थेट या दोन्ही नगरसेवकांना महसूल बढ गया तो आपको कोई दिक्कत है क्या? असा थेट प्रतिप्रश्न केला. उपायुक्तांच्या या प्रतिप्रश्नासमोर मात्र, हे दोन्ही नगरसेवक हतबल झाले. आता डाळ शिजणार नाही, ही बाब लक्षात घेऊन या दोन्ही नगरसेवकांनी काढता पाय घेतला. या विषयाची चर्चा सुरू होती.