आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Illegal Alcohol Sellers Apposite Expedition In Dahihandi Area

दहीहांडा परिसरात अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध मोहीम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवरी - अकोट तालुक्यातील दहीहांडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे यांनी अवैध व्यावसायिकांविरोधात आघाडी उघडली असून, शनिवारी तीन ठिकाणी छापा टाकून १२ हजार रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त केला आहे.

दहीहांडा पोलिसांनी आज पुंडा येथे दोन, तर किनखेड पूर्णा येथे एक कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान, पुंडा येथे चंद्रकला रामराव रायबोले (वय ५२) या महिलेच्या घराच्या अंगणातून सहा हजार २५० रुपये किमतीच्या १२५ देशी दारूच्या बॉटल्स जप्त केल्या. दुस कारवाईत पुंडा येथीलच मंदा भानुदास मालवे (वय ४०) या महिलेच्या घरून साडेचार हजार रुपये किमतीच्या देशी दारूच्या ९० बॉटल्स जप्त केल्या आहेत. तिसरी कारवाई किनखेड पूर्णा येथे करण्यात आली असून, येथून गुरुनाथ प्रल्हाद सपकाळ याच्याजवळून बाराशे रुपयांच्या २० देशी दारूच्या बॉटल्स जप्त केल्या. या तीनही कारवाईत एकूण ११ हजार ९५० रुपयांचा दारूसाठा जप्त करून या अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध ६५ ई-कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला. ही कारवाई ठाणेदार घुगे यांच्यासह पोलिस कर्मचारी दिलीप इंगळे, रामेश्वर राऊत, राजीव रिंगणे, दयाराम राठोड, चंदू सारवे, सावदेकर यांनी केली. ठाणेदार घुगे यांनी पदभार स्वीकारल्यावर अवघ्या दोन महिन्यांत ४० हून अधिक कारवाया जुगार आणि अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध केल्या आहेत. दरम्यान, या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाब दणाणले आहेत.

कारवाईच्या भीतीने महिलेने अवैध देशी दारू ठेवली होती खड्ड्यात गाडून चंद्रकलारायबोले या महिलेने पुंडा येथे तिच्या घराच्या अंगणात खड्डा करून त्यामध्ये देशी दारूचा साठा लपवून ठेवला होता. या खड्ड्यावर कवेलू ठेवले होते. मात्र पोलिसांनी हा दारूसाठाही जप्त केला आहे. पोलिस कारवाईपासून दूर राहण्यासाठी अवैध दारू विक्रेते विविध शक्कल लढवत असल्याचेही या कारवाईतून उघड झाले आहे.

दहीहांडा पोलिस ठाण्यात अपुरी कर्मचारी संख्या
सध्या दहीहांडा पोलिस ठाण्यात ३३ कर्मचारी असून, त्यांच्यावर ७२ गावांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. अपु कर्मचारी संख्येमुळे अवैध धंदेवाल्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. ठाणेदार घुगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या अवैध धंदेवाल्यांवर अंकुश लावण्याची मोहीम उघडली असली, तरी लपूनछपून अवैध धंदे सुरूच आहेत. त्यामुळे चोहोट्टा चौकी येथे १० कर्मचारी दहीहांडा येथेही कर्मचारी वाढवून देण्याची मागणी होत आहे. चाेहोट्टा चौकीला ५२ खेडे जोडलेले आहेत. त्यातच आता ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार अाहे. त्यामुळे येथील कायदा सुव्यवस्था आणि अवैध धंदेवाल्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस कर्मचारी वाढवून मिळणे गरजेचे आहे.

कर्मचारी वाढवून मिळायला हवे
अवैध धंदेवाल्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी येथे पोलिस कर्मचारी वाढवून देण्याची गरज आहे. तसेच आगामी काळातील सण, उत्सव आणि निवडणूक लक्षात घेता कायदा सुव्यवस्थेसाठी कर्मचांची गरज भासणार आहे.'' भाऊराव घुगे, ठाणेदार,दहीहांडा, पोलिस स्टेशन

पोलिस कर्मचारी वाढवून देऊ
अवैध धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी मोहीम उघडली आहे. तसेच एक पथकही गठीत करण्यात आलेले आहे. दहीहांडा येथील कर्मचारी संख्या लक्षात घेते येथे लवकरच पोलिस कर्मचारी वाढवून देण्यात येतील. तसेच अन्य समस्यांकडेही लक्ष देण्यात येईल.'' चंद्रकिशोर मीणा, जिल्हापोलिस अधीक्षक, अकोला