आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध होर्डिंग्जधारकांविरुद्ध गुन्हे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - न्यायालयाच्यानिर्देशानुसार शहरात अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्याची मोहीम सुरू आहे. पूर्व झोनमध्ये डिसेंबरला सिव्हिल लाईन्स पोलिस ठाणे ते रतनलाल प्लॉट चौक यादरम्यान एकूण १५ अनधिकृत होर्डिंग्जधारकांविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले. व्यावसायिकांनी मनपाची परवानगी घेऊनच होर्डिंग्ज लावावेत, असे आवाहन पूर्व झोनचे अधिकारी अनिल बिडवे यांनी केले आहे.
या कारवाईत संदीप ट्रेडर्स, पूर्णाश्री कलेक्शन, न्यू पार्थ मोबाइल, इशिता मोबाइल, मेहर मोबाइल, पीटर इंग्लंड, मातोश्री कलेक्शन, रिषी कलेक्शन, जिन्स हाऊस, खुशी इलेक्ट्रॉनिक्स, ओम कलेक्शन, दिशीता फॅशन, वर्षा युनिक आदी प्रतिष्ठानांवर जाहिरात होर्डिंग्ज काढण्याची कारवाई करण्यात आली. अनधिकृत होर्डिंग्ज लावले चुकीचे असून, व्यावसायिकांनी परवानगी घेऊनच होर्डिंग्ज लावावेत, असे आवाहन अनिल बिडवे यांनी केले. ही कारवाई दयानंद चिंचोलीकर यांच्या आदेशान्वये क्षेत्रीय करण्यात अाली. या मोहिमेत कैलास पुंडे, संजय खोशे, शैलेश पवार, मोहन दार्वेकर, महंमद रिजवान, सदानंद नाकट, बाबाराव शिरसाट, अनिल जगताप, धीरेंद्र पवार, पवन अग्रवाल, राजेश अग्रवाल, महंमद अय्युब, नारायण राऊत, संजय वाहुरवाघ, गोविंद करीहार आदींनी सहभाग घेतला.शहरातील अवैध होर्डिंग्ज साेमवारी काढण्यात अाले.