आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनधिकृत केबल ऑपरेटर्स बुडवताहेत लाखोंचा महसूल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरातील हजारो अनधिकृत केबलधारक शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत आहेत. जिल्हा करमणूक कर विभाग मात्र झोपेचे सोंग घेत आहे. अकोला शहरासह बार्शिटाकळी, पातूर, तेल्हारा या तालुक्यांतही मोठय़ा प्रमाणात अनधिकृत केबल ग्राहकअसल्याचे सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यात 29 हजार 500 केबल ऑपरेटर्स, तर डी.टी.एच. ऑपरेटर्सची संख्या 40 हजार आहे. शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी व पाच लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ठिकाणी केबल ऑपरेटर्स कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत अधिकृत केबल कनेक्शन घ्यावे, असा नियम आहे. मात्र, या नियमाला हरताळ फासल्या जात आहे. महसूल विभागाचे प्रमुख असलेल्या तहसीलदारांनी अनेकदा अनधिकृत केबल ग्राहकांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अशा अनधिकृतपणे केबल कनेक्शन घेतलेल्या धारकांचा शोध घेणे करमणूक विभागासमोर आव्हान आहे.
शोधमोहीम राबवणार
करमणूक कर चोरी हा गंभीर गुन्हा आहे. हा प्रकार थांबवण्यासाठी तहसीलदारांच्या मदतीने पथक तयार करण्यात आले आहे. लवकरच शोधमोहीम राबवली जाणार आहे.’’ जी. जी. गिरी, जिल्हा करमणूक कर अधिकारी, अकोला.

कर बुडवण्याचा प्रयत्न
केबल पॉइंटवरून हा प्रकार घडत असताना यास केबल ऑपरेटर्सचीसुद्धा मूक संमती असल्याची वास्तविकता आहे. केवळ कर बुडवण्यासाठी व अर्थकारणापोटी केबल ऑपरेटर्स याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

जाणीवपूर्वक दुर्लक्ष
नियमबाह्यपणे केबल कनेक्शन घेऊन शासनाला हजारो रुपयांचा चुना लावला जात आहे. मात्र, या प्रकाराची जाणीव असलेल्या केबल ऑपरेटर्सकडूनच अर्थकारणाअभावी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे