आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामदासपेठ पोलिसांनी जप्त केले अवैध 16 गॅस सिलिंडर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- विजयनगरातील दोन घरांवर रामदासपेठ पोलिसांनी रविवार, 1 डिसेंबर रोजी छापा टाकला. त्यात एकूण 16 सिलिंडर आणि मालवाहू ऑटोरिक्षा जप्त करण्यात आला.
अवैध दारूच्या अड्डय़ावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या रामदासपेठ पोलिसांना विजयनगरातील एका घरात गॅस सिलिंडरचा अवैधरीत्या साठा केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संतोष शंकरराव नृपनारायण आणि संजय नृपनारायण यांच्या घरांवर छापे टाकले. पोलिसांनी छाप्यात घरगुती 11 आणि व्यावसायिक पाच सिलिंडर जप्त केले. काही सिलिंडर एका मालवाहू ऑटोरिक्षामध्ये (क्रमांक : एमडब्ल्यूटी-7992) ठेवल्याचे आढळले. त्यामुळे पोलिसांनी हा ऑटोरिक्षाही ताब्यात घेतला. हे सिलिंडर धनलक्ष्मी गॅस एजन्सीचे होते. ठाणेदार विलास पाटील, सुरेश वाघ, नरेंद्र चर्‍हाटे, संजय भारसाकळ, गणेश पांडे, विलास आखरे, आशीष ठाकूर, सुनील टोपकर, गणेश ढोरे यांनी ही कारवाई केली. दरम्यान, मनकर्णा प्लॉट परिसरात रविवार, 1 डिसेंबरला छापा टाकून रामदासपेठ पोलिसांनी 40 लिटर गावठी दारू जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी नथ्थू हुसेन चौधरीविरुद्ध कारवाई केली.