आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात अवैधरीत्या वापरातील दहा गॅस सिलिंडर जप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात छापे टाकून रामदासपेठ पोलिसांनी सोमवारी 10 गॅस सिलिंडर जप्त केले. घरगुती वापराच्या या सिलिंडरचा हॉटेलमध्ये वापर करण्यात येत होता.
छाप्यात पोलिसांनी हितेश हरिकिसन खत्री (वंदना हॉटेल), श्याम शंकरलाल सारडा (स्वामी उपहार गृह), संजय लक्ष्मण बागडी (गणेश रेस्टॉरंट), अनिल ज्ञानेश्वर ढोरे (महालक्ष्मी उपहार गृह), सुधीर रामदास कोल्हटकर (शेगाव कचोरी), जयेश कोदळजी पटेल (शिवशक्ती हॉटेल) यांच्यावर कारवाई केली. पोलिसांनी या वेळी शेगडी व रेग्युलेटरही जप्त केले. या कारवाईत एकूण 42 हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.
ठाणेदार विलास पाटील, हेडकॉन्स्टेबल सुरेश वाघ, नरेंद्र चर्‍हाटे, संजय भारसाकळ, गणेश पांडे, विलास आखरे, आशीष ठाकूर, सुनील टोपकर, गणेश ढोरे यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी तपास करण्यात येणार आहे.