आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोल्यात अवैध दारूच्या विक्रीत वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शहरासह जिल्ह्यात अवैध देशी आणि हातभट्टीची दारू विक्री अधिक प्रमाणात होत आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी असलेला राज्य उत्पादन शुल्क विभाग मात्र कागदी घोडे नाचवण्यात दंग आहे. मागील तीन वर्षांत केवळ 250 विभागीय गुन्हे दाखल झाल्याची माहिती हाती आली आहे. जिल्ह्यात मागील तीन वर्षांत अवैध दारू विक्रीप्रकरणी अल्प प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. शहरासह जिल्ह्यात अवैध दारू विक्री मोठय़ा प्रमाणात होत आहे.

दरम्यान, आगामी सण उत्सव लक्षात घेता उत्पादन शुल्क विभागाकडून कोणतीच कारवाई करण्यात आल्याचे दिसत नाही तर कोणतेही नियोजन विभागाने केले नाही. एप्रिल 2011 ते मार्च 2012 या कालावधीत हातभट्टीच्या दारू विक्री 401 प्रकरणात कारवाई करण्यात आली. या कारवाईत 70 आरोपींना पकडण्यात आले आहे. 332 आरोपी न सापडलेली प्रकरणे दाखल केलेली आहेत. या केलेल्या कारवाईत आठ लाख दोन हजार 287 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. यासोबतच एप्रिल 2012 ते मार्च 2013 मध्ये हातभट्टीच्या 461 प्रकरणात कारवाई करण्यात आली.

या कारवाईत 90 आरोपींना पकडण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आले आहे. 374 आरोपींना पकडण्यात विभागाला यश आले नाही. या कारवाईत 11 लाख 38 हजार 134 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.