आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Illegal Money Transfer Through Hawala Couriers On Rise

कुरिअरच्या माध्यमातून होते असे काम, बुकींचा धंदा तेजीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- कुरिअरच्या 21 लाखांवर दरोडा पडल्याच्या निमित्ताने कुरिअर कंपन्यांच्या माध्यमातून होणारी पैशांची हस्तांतरण प्रक्रिया चर्चेत आली. हवाला, ब्लॅकमनी आणि कर बुडवता यावा, यासाठी कुरिअरच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण होत आहे. गोरखधंद्यात जिल्ह्यात रोज 12 कोटी रुपयांची उलाढाल होत असून, यासाठी कुरिअर कंपन्या त्या रकमेवर सहा ते आठ टक्के ‘शुल्क’ आकारत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

काही कुरिअर कंपनीच्या कर्मचार्‍यांचे लुटारूंशी लागेबांधे असतात. त्यामुळे लुटारूंना कुरिअरचा कर्मचारी केव्हा आणि कोणत्या दिशेने पैसे घेऊन जाणार आहे, याची इत्यंभूत माहिती असते. कुरिअरच्या माध्यमातून पैशांचे ट्रान्सफर होण्याच्या प्रक्रियेमुळे कर तर बुडतोच, शिवाय अवैध व्यवसायालाही चालना मिळते. अर्थात पोलिस आणि शासनाच्या इतर विभागातील अधिकार्‍यांचे खिसे ‘गरम’ होत असल्याने हा गोरखधंदा अव्याहतपणे सुरू आहे.अकोला सट्टय़ाचे केंद्र
अकोल्यात ‘जय माता दी’, ‘बालाजी’ या टोपण नावाने बुकींच्या टोळ्या आहेत. क्रिकेट मॅचच्या वेळी हे बुकी हॅाटलाइन उपलब्ध करून घेतात. या हॉटलाइनचा खर्च दिवसासाठी 20 ते 22 लाख रुपये असतो.

कंपनीची ‘गोपनीयता’
कुरिअर कंपनीचे कर्मचारी केवळ पारदर्शक कारभाराचा देखावा करतात. त्यानंतर कर्मचारी पाकीट फोडून ग्राहकाच्या माहितीची खातरजमा करण्याची तसदी घेत नाहीत.