आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध नळजोडणी शोधमोहीम , 35 जणांवर फौजदारी गुन्हा झाला दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला -अवैध नळजोडणीच्या अनुषंगाने नागरिकांना दिलेली मुदत संपुष्टात आल्यानंतर 15 पासून 19 जुलैपर्यंत शहराच्या विविध भागातील 35 जणांविरुद्ध अवैध नळजोडणीप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. या 35 जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता नंदलाल मेर्शाम यांनी दिली.
शहरातील अवैध नळजोडण्या वैध करण्यासाठी प्रशासनाने 15 जुलैपर्यंत मुदत दिली होती. या मुदतीत केवळ 300 नागरिकांनी आपल्या जोडण्या वैध केल्या. 15 जुलैनंतर अवैध नळजोडणी शोध मोहिमेत ज्या नळजोडण्या अवैध आढळतील त्या अवैध नळजोडणीधारकांवर संबंधित पोलिस ठाण्यात फौजदारी दाखल करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला होता. त्यामुळे 16 जुलैपासून अवैध नळजोडणी मोहीम सुरू करण्यात आली. 16 जुलैला आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी स्वत: या मोहिमेत भाग घेऊन चार हॉटेल व्यावसायिकांच्या अवैध नळजोडण्या उजेडात आणल्या होत्या. या चार हॉटेल व्यावसायिकांवर अवैध नळजोडणीप्रकरणी पोलिस ठाण्यात फौजदारी दाखल करण्यात आली, तर त्यानंतर तीन दिवसांत आणखी 31 जणांवर अवैध नळजोडणीप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले.
अवैध नळजोडणी शोध मोहीम यापुढेही सुरूच राहणार असून, अवैध नळजोडणीधारकांवर फौजदारी दाखल करण्यात येईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.