आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Illegal Pipe Connection,Latest News In Divya Marathi

अवैध नळजोडणीतून आला 27 लाख रुपयांचा महसूल; 570 नागरिकांनी केल्या जोडण्या वैध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अवैध नळजोडणीच्या माध्यमातून महापालिकेला महिन्याभरात 26 लाख 93 हजारांचा महसूल प्राप्त झाला आहे. आतापर्यंत 570 नागरिकांनी अवैध नळजोडण्या वैध करून घेतल्या आहेत. अवैध नळजोडणी वैध करण्याची मोहीम महापालिकेकडून सुरू आहे. महापालिकेच्या मालमत्ता कर विभागात 80 हजारांच्या जवळपास मालमत्तांची नोंद आहे, तर पाणीपुरवठा विभागाच्या दप्तरी केवळ 32 हजार नळजोडण्यांची नोंद आहे.
यामुळे शहरात हजारो अवैध नळजोडण्या आहेत, या आशयाचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. प्रशासनाने प्रथम अवैध नळजोडणीधारकांवर फौजदारी नंतर दंडात्मक कारवाई केली. प्रशासनाने अवैध नळजोडणीधारकांना नळजोडण्या वैध करण्याचे आवाहन केले होते. परंतु, या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, फौजदारी प्रकरणात दहा जणांना जुने शहर पोलिसांनी अटकही केली होती. या अटकेच्या वृत्तामुळे अवैध नळजोडणीधारकांमध्ये खळबळ उडाली होती. यानंतर अवैध नळजोडणी वैध करण्यासाठी नागरिकांनी महापालिकेत धाव घेतली आहे. एक महिन्याच्या कालावधीत आतापर्यंत 570 नागरिकांनी आपल्या जोडण्या वैध केल्या आहेत. यातून महापालिकेला 26 लाख 93 हजार 646 रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. अवैध नळजोडणीधारकांनी आपल्या जोडण्या वैध करून प्रशासनाला सहकार्य करावे व कारवाईची नामुष्की टाळावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.