आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा प्रशासनाने तोडल्या दहा अवैध नळजोडण्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पाणीपुरवठायोजनेतील तोटा कमी करण्याच्या हेतूने महापािलका प्रशासनाने २७ ऑगस्टपासून अवैध नळजोडणीधारकांविरुद्ध थेट नळजोडणी तोडण्याची मोहीम सुरू केली आहे. पहिल्या दिवशी एकूण दहा अवैध नळजोडण्या तोडण्यात आल्या तर २० अवैध नळजोडणीधारकांना नोटीस बजावण्यात आल्या. तसेच प्रत्येक अवैध नळजोडणीधारकाला तीन वर्षांची पाणीपट्टी भरण्याचे आदेशही देण्यात आले.
महापािलका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध नळजोडण्या असल्याने महापािलकेला पाणीपुरवठा योजना तोट्यात चालवावी लागते. यापूर्वीही महापािलका प्रशासनाने अवैध नळजोडणीधारकांवर दंडात्मक तसेच फौजदारीची कारवाई केली. तसेच अवैध नळजोडण्या वैध करण्याचे आवाहन करत वेळही दिला. परंतु, नागरिकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आता थेट अवैध नळजोडण्या तोडण्याची मोहीम प्रशासनाने सुरू केली आहे.
२७ ऑगस्ट रोजी पाणीपुरवठा विभागाच्या पथकाने जुने शहरातील अयोध्यानगर, गायत्रीनगर, पार्वतीनगर भागातील अशोक गुहे, भगवानसिंग राजपूत, विजय वाघकर, अण्णासाहेब देशमुख, गणेश पवार, व्ही.एन.ठाकूर, कैलास देशमुख, गणेश जुमळे, संजय घोडे, हेमंत कथले या दहा अवैध नळजोडणीधारकांच्या नळजोडण्या तोडल्या तसेच या सर्वांना तीन वर्षांची पाणीपट्टी भरण्याची सूचना केली.
अवैध नळजोडणी तोड मोहिमेंतर्गत अनेक नागरिकांनी एक ते दोन दिवसाची संधी मागितल्याने या पथकाने सुरेश बावणे, श्यामराव मराठे, दीपक सालफळे, छाया गढे, गजानन ढवळे, रवी भोपाळे, विठ्ठल राऊत, गजानन काळे, प्रकाश तिवारी, दिगंबर नालट, सरोज गुप्ता, प्रकाश कंडुरकर, राजेश कवाडकर, गणेश दोडकर, महादेव टेकाडे, अरुण ढवळे, रमेश बानोट, प्रवीण गोटकर या २० जणांना एक ते दोन दिवसाची संधी देत तीन वर्षाची डिमांड नोटीस दिली आहे. ही मोहीम शैलेश चोपडे, पद्माकर गवळी, संतोष पाचपोर, शेख फिरोज यांनी राबवली. पाणीपुरवठा योजनेतील तोटा कमी करण्याच्या हेतूने ही मोहीम सातत्याने राबवली जाईल, अशी माहिती महानगरपािलकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.