आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध नळजोडणी शोधमोहिमेला गती, दिवस १२; कारवाई हजारांवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरातील अवैध नळजोडण्या वैध करण्याची धडक मोहीम *का प्रशासनाने १८ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू केली आहे. अवैध नळजोडण्या समूळ नष्ट करण्यासाठी १२ दिवसात एक हजार अवैध नळजोडण्या वैध करण्याचे टार्गेट पाच अभियंत्यांना देण्यात आले आहे. या अभियानाच्या पहिल्या दिवशी पूर्व पश्चिम झोनमधील एकूण ३१ अवैध नळजोडण्या पथकाने तोडल्या, तर एकूण ४५ अवैध नळधारकांना नोटीस दिल्या. पहिल्या दिवशी एकूण ४६ हजार रुपयांचा महसूलही प्राप्त झाला.

३० सप्टेंबरपर्यंत १२ दिवसांत एक हजार अवैध नळजोडण्यांवर कारवाईचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. मागील दोन महिन्याच्या काळात अनेकदा अवैध नळजोडणी शोधमोहीम राबवण्यात आली. अवैध नळजोडणीधारकांनी आपल्या जोडण्या वैध कराव्यात यासाठी विविध फंडे वापरले. एकीकडे कारवाई करतानाच दुसरीकडे अवैध नळजोडणीधारकांना आपल्या जोडण्या वैध करण्याचे आवाहन केले. मागील दोन महिन्यात एकूण ९२० अवैध नळधारकांनी आपल्या जोडण्या वैध केल्या. या माध्यमातून *का प्रशासनाला एकूण ४४ लाख रुपयांचा महसूलही प्राप्त झाला.

काही दिवसांपासून अवैध नळजोडणी शोधमोहीम बंद होती. आयुक्तांनी ही मोहीम १८ सप्टेंबरपासून सुरू करण्याचे आदेश दिले. या आदेशान्वये आज ही मोहीम पश्चिम झोनमधील गुरुदेवनगर, गायत्रीनगर तर पूर्व झोनमध्ये न्यू भीमनगर, साईनगर, तोष्णीवाल लेआउट, न्यू राधाकिसन प्लॉट या भागात राबवण्यात आली. ही मोहीम आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या आदेशान्वये उपअभियंता नंदलाल मेश्राम, संदीप चिमनकर, शैलेश चोपडे, धीरज ठाकूर, संतोष पाचपोर, रमेश थुकेकर, संजय डोंगरे, संजय पाटील, शेख िफरोज शेख गफूर यांनी राबवली.

ग्रीन अकोला-क्लीन अकोला सोबतच नागरिकांना सर्व सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. यापूर्वी अवैध बांधकाम तर आता अवैध नळजोडण्या वैध करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळेच एकीकडे ग्रीन अँड क्लीन तर दुसरीकडे शिस्तही महत्त्वाची आहे. त्यामुळेच प्रशासनाचे हे अभियान सुरू आहे.'' डॉ.महेंद्र कल्याणकर, आयुक्त*का अकोला.
अमृतवाडी भवनचाही समावेश
शहरातीलगांधीरोडिस्थत न्यू राधाकिसन प्लॉटमधील प्रसदि.्ध असलेल्या अमृतवाडी भवनातही अवैध नळजोडणी आढळून आली. विशेष म्हणजे हे भवन प्रसदि.्ध असून या भवनात विवाहासह विविध समारंभ होतात.
तीन कोटींचा महसूल मिळण्याची शक्यता
अवैधनळजोडणी मोहिमेत नळजोडणी वैध करण्यासाठी तीन वर्षाच्या पाणीपट्टीचा भरणा करावा लागतो. अन्यथा अवैध नळजोडणी तोडल्या जाते. त्यामुळे बहुतांश नागरिक तीन वर्षाच्या पाणीपट्टीचा भरणा करतात. एक हजार अवैध नळजोडण्यांवर कारवाई झाल्यास *केला किमान तीन कोटी रुपयांचा महसूल मिळू शकतो.
यांना बजावल्या नोटीस
अवैधनळजोडणी तोडण्यासोबतच पश्चिम झोनमधील गायत्रीनगर शविदास वानखडे, गीता कुमरे, सुरेश झाडे, शंकर अंबुसकर, आशा काळे, मिलिंद जोशी, गणेश राऊत, गजानन सिवाने, विक्की जगताप, साहेब सुरजुसे, कुसुम सोनटक्के तर गुरुदेवनगर भागातील मोतीराम कुरई, कमला थोरात, गोपाल डोंगरे या अवैध नळजोडणीधारकांना अ‌वैध नळजोडणीप्रकरणी नोटीस बजावण्यात आल्या असून, प्रत्येकाला तीन वर्षाची पाणीपट्टीचा भरणाही करावा लागणार आहे.

यांच्या तोडल्या अवैध नळजोडण्या
साईनगरमधीलअरुणा बोदळे, शोभा आठवले, विष्णू राठोड, न्यू भीमनगरच्या कोकिळा जोंधळे, जयश्री ताठे, सुरेश वानखडे, गंगा बजड, विष्णू कुरवाळे, शारदा दीक्षित, श्रीराम फुंडकर, गजानन टेकाडे, सुभद्रा लकडे, कस्तुरा मेतकर, विद्या दवंडे, गजानन खडसे, लीला दंदी, संतोष इंगोले, मारोती मांढळे, शोभा आठवले, रामदास लाहे, तोष्णीवाल ले-आउटमधील सदि.्धनाथ देसाई. गायत्रीनगर भागातील मीरा कान्हेकर, माणिक राऊत, यशवंत राऊत, महादेव टेकाडे, नाना गोयल, िशवदास गावंडे, संजय दार्वेकर, कांती अग्रवाल, सुनीता चतरकर आदी.