आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यामध्ये विनापरवाना बियाणे विक्रीला आले उधाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - काेणताही परवाना नसताना अनेक जण शहरात ग्रामीण भागात बियाणे, रसायने औषधी विक्रीची दुकाने थाटत आहेत. तर दुसरीकडे अधिकृत कृषी केंद्रांवरूनही पीक वाढ संजीवके परवाना नसताना सर्रास विकली जात असून, विशिष्ट बियाणे उपलब्ध नसल्याच्या नावावर शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू आहे. या प्रकाराकडे गुणवत्ता नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
अक्षयतृतीयेनंतर साधारणपणे शेतकरी धूळपेरणीला सुरुवात करतात. त्यामुळे एप्रिल महिन्यातच बियाणे खरेदीची लगबग सुरू होते. प्रत्येकच बियाणे कंपनीच्या जाहिराती गावोगावी केल्या जात आहेत. कंपन्यांमार्फत बियाण्यांची विक्री करण्यासाठी गावोगावी आपले एजंट नेमण्यात आले आहेत. हे एजंट आपल्या सोयीप्रमाणे बियाण्यांची विक्री करत शेतकऱ्यांना फसवत आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांची निकड लक्षात घेऊन कृषी केंद्र संचालकांकडून एप्रिल महिन्यातच बियाण्यांचा तुटवडा असल्याचे सांगितल्या जात अाहे.
बियाणे कंपन्यांच्या जाहिरातीनुसार बियाणे बाजारपेठेत मुबलक दरात उपलब्ध असल्याच्या जाहिराती लावण्यात आल्या आहेत. मात्र, कृषी केंद्र संचालकांकडून याविरुद्ध चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. या प्रकाराची दखल घेत कृषी विभागाने ही परिस्थिती नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. नाहीतर शेतकऱ्यांची लूट सुरू राहील यात शंका नाही.

शासनानेयादी जाहीर करावी

जिल्ह्यात किती कुणाकडे कृषी बियाणे, रसायने औषधी विक्रीचा परवाना आहे ही माहिती कृषी विभागाने जाहीर करावी. त्याशिवाय आपल्या गावातील कृषी केंद्र वैध की अवैध हे शेतकऱ्यांना समजणे कठीण आहे. कृषी विभागाकडूनच अनाधिकृत कृषी केंद्रांना अभय मिळत असल्याचे वास्तव आहे. या सर्व प्रकाराची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेऊन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ कारवाईच्या सुचना द्याव्यात. नाहीतर दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही एवढे निश्चित.

पथक नेमणार
विना परवानाकृषी केंद्रे लावणे नियमबाह्य आहे. अशा दुकानाविरुद्ध निश्चित कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी शेतकऱ्यांनी याबाबत तालुका तसेच जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांकडे तक्रारी कराव्यात. १५ मेपासून यावर नियंत्रणासाठी स्वतंत्र पथक कार्यरत असणार आहे.'' एच.जी. ममदे, जिल्हा कृषी विकास अधिकारी, अकोला
दुकानदारांकडून नियमांकडे कानाडोळा
कृषीविभागामार्फत दिल्या जाणाऱ्या कृषी केंद्राच्या परवान्यानुसार, परवान्यात नमूद केलेल्या कंपनीचेच उत्पादन ठेवण्याची परवानगी दुकानदाराला दिली जाते. त्याव्यतिरिक्त दुसरे बियाणे, रासायनिक खते तसेच कीटकनाशके ठेवता येत नाही. मात्र, जिल्ह्यातील सर्वच कृषी केंद्र संचालक या नियमाकडे दुर्लक्ष करत सर्रास नियमबाह्यरीत्या बियाणे कीटकनाशके दुकानात ठेवल्या जात आहे.
आर्थिक लूट
खरीप हंगामासाठी आवश्यक असलेले बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे. याच संधीचा फायदा कृषी केंद्र संचालकांकडून घेतल्या जात आहे. कंपनीने निश्चित केलेल्या दरापेक्षा दुप्पट किमतीने कपाशी, सोयाबीनचे बियाणे विकल्या जात आहे.