आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१४ अवैध नळजोडण्या उद्ध्वस्त; हजारो फूट अ‌वैध जलवाहिन्यांचे जाळेही उपसले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मुख्य जलवाहिनीवर बार्शिटाकळी येथील अवैध नळजोडणी शोधमोहिमेच्या तिसऱ्या दिवशी एकूण १४ अवैध नळजोडण्या उद््ध्वस्त करण्यात आल्या. याचसोबत हजारो फूट पसरलेल्या अवैध जलवाहिन्याही जमिनीतून उपसण्यात आल्या. गेल्या तीन दिवसांत महापालिकेने ८१ अवैध नळजोडण्या तोडल्या. प्रशासनाने राबवलेली ही मोहीम ऐतिहासिक म्हणून गणल्या गेली आहे. या मोहिमेमुळे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

शहराला काटेपूर्णा प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. सन १९७७ मध्ये ६०० मिलिमीटर व्यासाची "महान ते अकोला', अशी मुख्य जलवाहिनी अंथरण्यात आली. सीआय पद्धतीची ही जलवाहिनी जुनी असून, बार्शिटाकळी शहरातील जुन्या मार्गावरून ती गेली आहे. बार्शिटाकळी ग्रामपंचायतीलाही याच जलवाहिनीवरून पाणीपुरवठा केला जात होता. परंतु, ग्रामपंचायतीने पाणीपट्टीचा भरणा केल्याने मनपाने पाणीपुरवठा बंद केला. परंतु, गावकऱ्यांनी तसेच ग्रामपंचायतीने थकित कराचा भरणा करता गावातून गेलेल्या मुख्य जलवाहिनीवर पाऊण ते दोन इंची आकाराच्या अवैध नळजोडण्या घेतल्या. केवळ अवैध नळजोडण्यावरच काम थांबले नाही, तर या माध्यमातून संपूर्ण गावात अवैध जलवाहिन्यांचे जाळे अंथरूण सर्रासपणे पाणीपुरवठा केला जात होता. मनपाने ग्रामपंचायतीला वारंवार तोंडी तसेच लेखी सूचना दिल्या. परंतु, त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. उपायुक्त चिंचोलीकर यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला. पोलिस बंदोबस्त मिळाल्यानंतर शनिवारपासून मोहीम राबवली. मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्य जलवाहिनीवरील उर्वरित अवैध नळजोडण्या, गावात टाकलेल्या जलवाहिन्या जमिनीतून उपसून काढून जप्त केल्या. आज पथकाने एकूण १४ अवैध नळजोडण्या उद््ध्वस्त केल्या. कारवाईत उपायुक्त दयानंद चिंचोलीकर, शहर अभियंता अजय गुजर, कार्यकारी अभियंता सुनील काळे, कनिष्ठ अभियंता नंदलाल मेश्राम, नरेश बावणे, शैलेश चोपडे, संदीप चिमणकर, कैलास निंगरोट, नीरज ठाकूर, विष्णू डोंगरे तसेच कंत्राटदार शेख फिरोज, संतोष ढगे आदींसह अनेक कर्मचारी सहभागी झाले होते.

आकार संख्या जलवाहिन्यांची लांबी
एकइंची २०० ते ५०० फूट
दीड इंची १५०० फूट
दोन इंची २५० ते ७०० फू

तुम्हालाही शहरात यावे लागते : तुम्हीआमच्या गावात आहात, असा इशारा देत जलवाहिनी फुटल्यास आम्ही जबाबदारी नाही, असे सांगून अधिकाऱ्यांना कारवाई करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी केला. मात्र, अधिकाऱ्यांनीही तुम्हाला कामासाठी अकोला शहरात यावे लागते, ही बाब विसरू नका, असा सूचक इशारा दिला.