आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Impurity On Akola Railway Station Issue., Divya Marathi

अकोला रेल्वे स्टेशनवर यत्र-तत्र-सर्वत्र अस्वच्छता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे अपर मंडळ प्रबंधक (एडीआरएम) प्रदीप बारापात्रे व वरिष्ठ वाणिज्य मंडळ प्रबंधक एन. जी. बोरीकर यांनी बुधवारी सर्व्हिस इप्रुव्हमेंट ग्रुप दौर्‍यांतर्गत अकोल्यासह पारस व शेगाव रेल्वेस्थानकांची पाहणी केली. या स्थानकांमध्ये स्वच्छतेचा अभाव दिसून आल्याने त्यांनी संताप व्यक्त करीत स्वच्छता मोहीम राबवण्याचे आदेश स्थानकप्रमुखांना दिले. तसेच खानपान विभागाविषयी प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेत खाद्यपदार्थांचा दर्जा तसेच छापील किमतीपेक्षा जादा दराने विक्री केल्याचे निदर्शनास आल्यास त्याचा परवाना तत्काळ निलंबित करण्याचा सूचना अन्न निरीक्षक अधिकार्‍याला दिला.
वरिष्ठ अधिकार्‍यांचा पाहणी दौरा असला की संपूर्ण स्थानक परिसर चकाचक करण्याची प्रथा फार जुनी आहे. परंतु, दौर्‍याची पूर्वकल्पना न देता अपर मंडळ प्रबंधक प्रदीप बारापात्रे यांनी नियोजित दौर्‍याच्या आधल्या रात्रीच, 27 रोजी येथे येऊन स्थानकाची पाहणी केली. त्यांना रेल्वेस्थानक फलाट, स्वच्छतागृहांमध्ये अस्वच्छता आढळून आली. 28 रोजी त्यांनी शेगाव, पारस स्थानकाची पाहणी केली. तेथेही त्यांना अस्वच्छतेचा आढळली. बुधवारी येथे त्यांनी वरिष्ठ वाणिज्य मंडळ प्रबंधक एन. जी. बोरीकर, स्थानकप्रमुख पी. बी. गुजर यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. या वेळी वरिष्ठ मंडळ विद्युत अभियंता देवदास दत्ता, मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ. सी. एन. पिपरीकर, आर. पी. शुक्ल, कमांडर पी. एल. वर्मा उपस्थित होते.