(हिंगोली पोलिसांनी डोईफोडे खून प्रकरणात अटक केलेले तीन आरोपी (मास्क लावलेले)
अकोला- रवी डोईफोडे खून प्रकरणातील पाचपैकी ताब्यात घेतलेल्या आणखी तीन आरोपींना हिंगोली पोलिसांनी आज अटक दाखवली असून, आणखी एक आरोपी फरार आहे. अनैतिक संबंधातून झालेल्या या खून प्रकरणात तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे दोघे जण त्यांचे मित्र आहेत.
जुने शहरातील रवी डोईफोडे खून प्रकरणातील आरोपींना वाशीम येथून अटक करण्यात आली आहे. या चारपैकी प्रमुख आरोपीच्या भूमिकेत असलेली वाशीम येथील उषा मुंढे नावाच्या महिला पोलिस कर्मचाऱ्याला यापूर्वीच अटक करण्यात आली असून, तिला जूनपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे, तर आज आणखी तीन पुरुष आरोपी अटक केले आहेत. त्यांपैकी एक लेकुले नावाचा पोलिस कर्मचारी असून, इतर शिवा आणि राजू हे दोघे त्याचे मित्र आहेत. हा पोलिस कर्मचारीदेखील हिंगोली जिल्ह्याचाच असून, वाशीम पोलिस दलात कर्मचारी आहे. या आरोपींना आज अटक दाखवण्यात आली असून, त्यांना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. उर्वरित आरोपी महिला लेकुले याची चव्हाण नावाची पत्नी फरार असून, तीसुद्धा वाशीम पोलिस दलातच आहे.
तपास आणि गुप्ततेच्या नावाखाली पोलिसांकडून आरोपींची पूर्ण नावे सांगितले जात नाहीत. पोलिस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी खुनाची कबुली दिली असून, त्यांनी संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला आहे.