आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकऱ्यांनो, नियोजन करा; तरच मिळेल अपेक्षित उत्पन्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- खरीप हंगाम पूर्णत: पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य नियोजन केल्यास अपेक्षित उत्पन्न मिळेल आणि नुकसान टळेल, असा प्रातिनिधिक सूर येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या (पीडीकेव्ही) वतीने विद्यापीठाच्या डॉ. के. आर. ठाकरे सभागृहामध्ये सोमवार, २५ मे रोजी झालेल्या खरीपपूर्व मेळाव्यातील कृषी शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनातून उमटला.
अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी होते. कृषी अधीक्षक कृषी अधिकारी मालापुरे, विस्तार शिक्षण संचालक प्रा. डॉ. प्रदीप इंगोले, प्रा. डॉ. विलास देशमुख, प्रा. डॉ. दिलीप मानकर, प्रगतिशील शेतकरी दादाराव देशमुख, नामदेवराव अढाऊ यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला वरिष्ठ संशोधक शास्त्रज्ञ डॉ. राठोड यांनी कपाशी लागवडीबाबत मार्गदर्शन केले. कपाशीचे उत्पन्न का कमी होते, ते वाढवण्यासाठी काय करावे, मशागतीचे महत्त्व, खोल नांगरणी, बियाण्यांचे प्रमाण, पेरणीची वेळ, झाडांची संख्या आणि अंतर याविषयी त्यांनी इत्थंभूत मार्गदर्शन केले. हवामान शास्त्रज्ञ डॉ. संजय वंजारी यांनी पावसाचे प्रमाण कसे राहील या आधारे पीक घ्यावे, याची माहिती दिली. दरम्यान, इतर शास्त्रज्ञांनी सोयाबीन, तेलबिया, ज्वारी याबाबत मार्गदर्शन केले. या वेळी प्रगतिशील शेतकरी अढाऊ, देशमुख यांनी अनुभव कथन केले.प्रास्ताविक विस्तार शिक्षण संचालक डाॅ. इंगोले यांनी केले. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले.
पीडीकेव्हीनेकेले ७० नवीन संशोधन
पीडीकेव्हीनेया वर्षांत संशोधन करून तब्बल ७० नवीन तंत्रज्ञान तयार केले आहेत. काहीच दिवसात राहुरी येथे होणाऱ्या ‘आग्रोसो’मध्ये त्यांना मंजुरी मिळेल, अशी माहिती कुलगुरू डॉ. दाणी यांनी या मेळाव्यात दिली. ते म्हणाले, आम्हाला शेतकऱ्यांकडूनही अनेक नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळते. सध्या विद्यापीठात सेंद्रिय शेतीचे प्रयोग सुरू आहेत. शेतकऱ्यांनी कधीही विद्यापीठाशी संपर्क केला तर त्यांना आमचे शास्त्रज्ञ योग्य मार्गदर्शन करतील, असे ते म्हणाले.
जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पाऊस लांबल्यास खरीप ज्वारी, बाजरी, तूर, सोयाबीन, कापूस, सूर्यफूल पिके घ्यावीत. अशा परिस्थितीत मूग, उडीद यांसारखी पिके योग्य ठरत नाहीत. त्यामुळे ती घेऊ नयेत, असा सल्ला या मेळाव्यात उपस्थित शेतकऱ्यांना दिला.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, पावसाने दडी मारल्यास…
बातम्या आणखी आहेत...