आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In ST Truck Accident Two People Were Seriously Injured

एसटी-ट्रक अपघातात दोन जण गंभीर जखमी; वाहतूक ठप्प

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाेरगावमंजू - ट्रकएसटीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले. राष्ट्रीय महामार्गावरील बाेरगावनजीक शुक्रवार, १४ नोव्हेंबर रोजी रात्री ८.१५ वाजता ही घटना घडली. दरम्यान, रात्री पाऊस सुरू असल्याने एसटीतील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी पोलिस, ग्रामस्थांना कसरत करावी लागली. वाहतूकही सुमारे तासभर ठप्प झाली होती.

कारंजा आगाराची एसटी (क्र. एमएच-४०-८८७८) १७ प्रवासी घेऊन अकोल्याकडे निघालेली होती. बाेरगावमंजू गावानजीक येताच अहमदाबादहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची एसटीची जाेरदार धडक झाली. धडक एवढी जाेरदार होती की चालकाच्या कॅबिनसह मागील काही भागापर्यंत एसटीचा पत्रा चिरतच गेला. यामध्ये एसटीचे चालक डी. पी. मोहाडे हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी अकोला येथे दाखल करण्यात आले आहे. एसटीचे समोरील चाकही रक्ताने भरलेले होते. ट्रकचालक अनवरखान (रा. अमरावती) हेही जखमी झाले असून, त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. चेहऱ्यावरही मार लागला.

एसटीचा वाहक पी. डब्ल्यू कीर्तने यांच्या माहितीनुसार ट्रक समोरील बसला आेव्हरटेक करत असताना मागील एक ट्रक एसटीवर आदळला. अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार आव्हाळे, पोलिस उपनिरीक्षक ठाकरे, हेडकाॅन्स्टेबल मावळे, उपर्वट, चंदन, जामनिकर, इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने एसटीतील जखमी प्रवाशांना बाहेर काढून उपचारासाठी दवाखान्यात हलव