आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलकापुरमध्ये धडक अतिक्रमण हटाव मोहीम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरालालागून असलेल्या मलकापूर येथे धडक अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. २८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजतापासून सरपंच राजू वगारे ग्रामविकास अधिकारी एन. एन. दामदर यांच्या मार्गदर्शनात गावातील अतिक्रमण काढण्यासाठी पथक सरसावले.

प्रियदर्शनी तंत्रनिकेतनचे अतिक्रमण पाडून मोहिमेला सुरुवात करण्यात आली. नंतर अंबिकानगरातील अमृत कलश विद्यालयाची इमारत पाडण्यात आली. पाण्याच्या टाकीजवळील कच्चे अतिक्रमण काढण्यात आले. पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण हटवण्यात आले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. उद्या, मलकापूर खडकी रोडवरील झोपड्यांचेे अतिक्रमण काढण्यात येणार आहेे. या रस्त्यावर लावण्यात आलेले बॅनर्स टपरीधारकांचेही अतिक्रमण हटवण्यात येईल, असे सरपंच राजू वगारे यांनी सांगितले.मलकापुरात बुधवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली.