आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

७६ वर्षीय आजोबाचे अश्लील वर्तन, अकोट-अकोला बसमध्ये महिलेसोबत गैरवर्तन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - म्हातारपणहे लहान मुलांसारखे असते, असे म्हटल्या जाते. मात्र, त्यामध्ये जर बालपणासारखे सोडून मद, मत्सर आणि लालसेच्या भावनेतून एखादी कृती घडते, तेव्हा त्या अशोभनीय वर्तनाला काय म्हणावे, अशीच एक घटना आज शनिवारी दुपारी बसमध्ये घडली. या बसमध्ये मुलीच्या वयासारखी असलेल्या विवाहितेसोबत एका ७६ वर्षीय वृद्धाने अश्लील वर्तन करून आपल्या पूर्ण हयातीलाच बट्टा लावला आहे.

शनिवारी अकोट-अकोला बस दुपारी वाजताच्या सुमारास देवरी फाटा ते कुटासा फाटादरम्यान येत होती. बसमध्ये गर्दी असल्यामुळे अनेक लोक उभे होते. त्या गर्दीमध्ये काही महिलासुद्धा हाेत्या. अशीच एक महिला पतीसह ितच्या मुलीला दवाखान्यात घेऊन येत होती. ही महिला एका ७६ वर्षीय वृद्धाजवळ उभी होती.

या वृद्धाने आपल्या वयाचा काहीही विचार करता या महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. त्या दुर्लक्षामुळेच या वृद्धाने महिलेसोबत अतिलगट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र महिलेने आपल्या पतीला घडत असलेला प्रकार सांगितला. त्यावर वृद्धाला पतीने चांगलाच चोप दिला. त्यानंतर बस थेट अकोटफैल पोलिस ठाण्यात पोहोचली. पोलिसांनी वृद्धास घडलेल्या प्रसंगाबाबत विचारले असता, त्याने आपण त्यातले नसल्याचे सांगून स्वत:वरील दोष मात्र महिलेवर ढकलला. याप्रकरणी महिलेने पोलिसात तक्रार दिली. तक्रारीत सर्वच घटनाक्रम नमुद करण्यात आला होता.