आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या धोरणामुळे शारीरिक शिक्षकांचा भार वाढणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रीडा क्षेत्राला अच्छे दिन
मंगरुळपीर- शासनाकडून क्रीडा विकासाकडे विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे सध्या जाणवू लागले आहे. त्यामुळे येत्या काळात क्रीडा क्षेत्राला अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. मात्र, असे असले तरी शाळांमध्ये असलेल्या क्रीडा शिक्षकांच्या नियुक्तीसंदर्भात शासनाकडून कोणताही निर्णय घेण्यात येत नसल्याचे सध्या चित्र आहे. त्यामुळे अाहे त्याच शिक्षकांकडून क्रीडाचे वाढीव काम करण्यात येईल, असे दिसत आहे.

शालेय स्तरापासून महाविद्यालयीन स्तरापर्यंत क्रीडा विषयाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. त्यात योगाचाही प्रचार-प्रचार करण्यात आला आहे. मात्र, असे असताना ज्यांच्या बळावर हा डोलारा उभा करण्याची कसरत चालली आहे, त्या शारीरिक शिक्षकांकडेच दुर्लक्ष करण्यात येत आहे. बहुतांश शाळांमध्ये सध्या शारीरिक शिक्षक कार्यरत नाही. तर काही ठिकाणी विद्यार्थी संख्यानिहाय शारीरिक शिक्षकांची संख्या नाही तर जेथे शारीरिक शिक्षक कार्यरत आहेत. तेथे शारीरिक शिक्षणाचे तास कमी तसेच इतर अध्यापनासह जबाबदाऱ्यांचा जास्त भार टाकण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे विनाअनुदानित कायम विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांमध्ये तर शारीरिक शिक्षकांचे महत्त्वच नाही. पैसे वाचवण्यासाठी जमेल तसे िनभावले जाते. विद्यार्थ्यांकडून मात्र आवश्यक ते शुल्क वसूल केले जाते. शारीरिक शिक्षणाच्या नावाने शाळा विद्यार्थ्यांना मैदानात उतरवतात. मात्र, मुलांना शिकवणारा शारीरिक शिक्षक या ठिकाणी उपलब्ध राहत नाही.

या सर्वच बाबींचा विचार करता शासनाच्या क्रीडासंदर्भात असलेले निर्णय स्वागतार्ह असले तरी अपूर्ण शारीरिक शिक्षकांअभावी खेळाडू तयार झाले तर तांत्रिक ज्ञानापासून वंचित असलेले खेळाडू आकारास येतील हे मात्र तितकेच खरे आहे. २५० विद्यार्थ्यांमागे एक शारीरिक शिक्षक असावा असा १९८८चा शासनाचा अध्यादेश आहे. मात्र, त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते. जर योग हा िनयमित विषय झाला तर िकमान योगतज्ज्ञांच्या नियुक्तीबाबत असे होऊ नये, याबाबत शासनाला दक्षता पाळावी लागेल. अन्यथा जे शारीरिक शिक्षक सध्या सेवेत आहेत, त्यांचेच हाल होतील.

शिखर संस्थांनी नवा अभ्यासक्रम सुरू करताना िकंवा घोषणा करण्यापूर्वी शाळा,महाविद्यालयांमध्ये त्या विषयाचे तज्ज्ञ शिक्षक आहेत काय याची पडताळणी करणे आवश्यक राहणार आहे.
बातम्या आणखी आहेत...