आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Independence Day Special: Chakar Family's Patrotism

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वातंत्र्य दिन विशेष: चाकर कुटुंबाचे असे हे देशप्रेम..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - देशासाठी अनेकांनी सर्वस्व अर्पण केल्याने स्वातंत्र्याचा सूर्य पाहायला मिळाला. देशसेवेचा वसा जपणार्‍या कुटुंबांच्या त्यागाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. राष्ट्रप्रेम व तिरंग्यावरील प्रेमाची भावना जोपासत अनेकजण आपापल्या परीने आजही कार्य करतात. अशाच प्रकारे अकोल्यातील चाकर कुटुंबीयही अर्धशतकापासून राष्ट्रध्वजाची आगळीवेगळी ‘सेवा’ करत आहेत.

देशसेवेच्या प्रेरणेतून मागील 50 वर्षांपासून चाकर कुटुंबीय तिरंगा ध्वजाची सफाई, इस्त्री ही सेवा मोफत करीत आहेत. बाजोरिया नगरी येथील किसन बाबूलाल चाकर यांचे 1964 पासून न्यू राधाकिसन प्लॉटस्थित गुरुद्वारा बिल्डिंगमध्ये लाँड्रीचे दुकान आहे. त्यांच्याकडे स्वातंत्र्यदिन, महाराष्ट्रदिन व गणराज्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वज इस्त्रीसाठी यायला लागले. मात्र, त्यांनी अधिकार्‍यांकडून त्या सेवेचा मोबदला घेतला नाही. सध्या ही सेवा 17 वर्षांपासून त्यांचे पुत्र गोपीअण्णा सांभाळतात. वर्षभरात 50-60 राष्ट्रध्वज इस्त्रीसाठी येतात. ही कामे आठ दिवसांच्या अगोदरच सुरू होतात. दरम्यान स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येलाही त्यांच्याकडे राष्ट्रध्वजाची इस्त्री सुरू होती.

त्यांच्या दुकानातील कामगार शंकर गाजले, सुनील मूर्तीकार, छोटू मूर्तीकार, रोहित दिवाकर यांच्यासह गोपीअण्णा चाकर राष्ट्रध्वजावर शेवटचा हात फिरवत होते.