आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगीत ‘रंजना’करिता नव्हे; आत्मरंजनासाठी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- भारतीय शास्त्रीय संगीत हे सर्वोच्च प्रकारचे भाव संगीत आहे. भारतीय संगीताची सुरुवात साम गायनाने झाली. स्वर ही रागाची सामग्री आहे आणि राग ही त्यातून घडणारी कलाकृती आहे. मनाला आनंद देणारी स्वर रचनेची नियमबद्ध चौकट म्हणजे राग होय. संगीत हे रंजन करत नाही ते आत्मरंजनासाठी आहे. त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी ही संगीतप्रेमींची आहे. प्राध्यापक, शिक्षकांनी किमान एक तरी रागरचना म्हणून प्रचार व प्रसार करावा, असे आवाहन डॉ. भोजराज चौधरी यांनी शुक्रवारी येथे केले.

येथील शिवाजी महाविद्यालयाच्या संगीत विभाग व विदर्भ संगीत अँकेडमीतर्फे 8 फेब्रुवारीला विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन झाले. या चर्चासत्राचा विषय ‘6 राग इज दि सोल ऑफ इंडियन म्युझिक’ हा होता. या चर्चासत्राचे बीजभाषक म्हणून ते बोलत होते. चर्चासत्राचे उद्घाटन शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार यांच्या अध्यक्षतेखाली झाले. उद्घाटक म्हणून शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य अँड. गजानन पुंडकर उपस्थित होते. बीजभाषक म्हणून विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालय, अमरावती येथील संगीत विभागप्रमुख डॉ. भोजराज चौधरी होते.

व्यासपीठावर अमरावती विद्यापीठाच्या संगीत अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजेंद्र देशमुख, डॉ. मिलिंद कुलट, मुख्य आयोजक प्राचार्य सुभाष भडांगे, संस्थेचे आजीवन सभासद हुकूमचंद धूत, विदर्भ संगीत अकादमीचे उपाध्यक्ष प्रा. मधुकर घाटे, अकोट येथील अँड. अतुल सोनखासकर, संगीत विभागप्रमुख प्रा. किशोर देशमुख, समन्वयक प्रा. शिरीष कडू, प्रा. हर्षवर्धन मानकर, प्रा. अनिल काळे, विद्यापीठ प्रतिनिधी पवन भुईभार आदींची उपस्थिती होती. सरस्वती पूजन व स्तवनानंतर पाहुण्यांचे स्वागत झाले. मुख्य आयोजक प्राचार्य भडांगे यांनी स्वागतपर भाषण केले. प्रास्ताविक प्रा. किशोर देशमुख यांनी केले. त्यांनी आयोजनामागील भूमिका मांडून पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर डॉ. भोजराज चौधरी यांचे उपयुक्त मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. वनिता भोपत यांनी केले. प्रा. अनिल काळे यांनी आभार मानले. चर्चासत्राच्या यशस्वितेसाठी प्रा. किशोर देशमुख, प्रा. शिरीष कडू, प्रा. हर्षवर्धन मानकर, प्रा. अनिल काळे, प्रा. नेत्रा मानकर व प्रा. वनिता भोपत आदींनी पुढाकार घेतला.

गाण्याच्या मैफलीने आणली रंगत
राज्यस्तरीय संगीत विषयावरील चर्चासत्रात दुपारी रंगलेल्या संगीत मैफलीने वेगळीच रंगत आणली. या मैफलीत संगीत क्षेत्रातील मान्यवरांनी विविध रागांचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. उपस्थित संगीतप्रेमींनीही गायनाला भरभरून दाद दिली.