अकोला- घरासमोर उभी करून ठेवलेली इंडिका कार अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोिलसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तुकाराम चौकातील सुदर्शन अपार्टमेंटमध्ये चेतन दत्तात्रय देशमुख (वय ३२) राहतात. त्यांनी शनिवारी संध्याकाळी
आपल्या घरासमोर एम.एच. ४३ ए. ७८८१ क्रमांकाची इंडिका कार उभी करून ठेवली होती. रविवारी सकाळी त्यांना गाडी दिसून आली नाही. त्यानंतर त्यांनी खदान पोिलस ठाणे गाठले आणि घटनेची तक्रार दिली. गेल्या १५ दिवसांपूर्वीसुद्धा तुकाराम चौकातून एका मारुती कारची चोरी झाली होती.