आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Information Of Indian Communist Party Leader MP D. Raja

ओबामांच्या येण्याला डाव्यांचा विरोध- खासदार डी. राजा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासाठी केंद्र सरकार लाल पायघड्या अंथरत आहे. परंतु, ओबामांच्या येण्याला आमचा विरोध असून, त्यांच्या निषेधार्थ शनिवारी २४ देशभर धरणे आणि निदर्शने करणार अाहे,अशी माहिती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते खासदार डी. राजा यांनी माध्यमांशी बोलताना दिली. देशात किमान सहा डावे पक्ष असून, ओबामांना सर्व डावे एकजुटीने विरोध करणार असल्याचे राजा यांनी स्पष्ट केले.
नरेंद्र मोदी यांचे सरकार अमेरिकेच्या दबावात काम करत आहे. सर्व क्षेत्रात विदेशी गुंतवणूक वाढवण्याचा अमेरिकेचा दबाव असून, िवमा संरक्षणसारख्या संवेदनशील क्षेत्रातही एफडीआय येऊ घातला आहे. यामुळे एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाला अाहे,असा आरोप राजा यांनी केला.
केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डाॅ. रामशंकर कठोरिया यांनी नागपुरात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अपेक्षित शिक्षणाच्या भारतीयीकरणाचा स्वीकार करणार असल्याचे सांगितले होते. त्यावर बोलताना डी. राजा यांनी हा संघ परिवाराचा देश तोडण्याचा डाव असून, त्याची सूत्रे नागपुरातून हलत अाहे,असा आरोप केला. शैक्षणिक व्यवस्थेत भारतीय संस्कृती मूल्यांचा समावेश असावा, असे संघ परिवाराचे प्रयत्न सुरू आहे, त्याला आम्ही विरोध करू, असे ते म्हणाले. येत्या २४ मार्चपासून पाँडेचेरी येथे भाकपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आहे. या बैठकीचा कार्यक्रम आणि मसुदा ठरवण्यासाठी नागपुरात बैठक सुरू आहे.