आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'Initiative For Change' Organizations Guideline To Student

‘इनिशिएटिव्ह फॉर चेंज’ संस्थेच्या देश-विदेशांतील विद्यार्थ्यांचा भावी शिक्षकांशी संवाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - आजसर्वत्र भ्रष्टाचार, लाचारी, बेकारी, खोटारडेपणा, अपवित्र विचार, गुन्हेगारी दिसून येते. आम्ही हे कधी बदलणार म्हणून चर्चा करतो. मात्र, दुर्देवाने आपणही त्यातलाच एक भाग असतो. "आपण बदललो तर जग बदलेल, स्वत:मध्ये सकारात्मक बदल घडवा', असा संदेश पाचगणी येथील ‘इनिशिएटिव्ह फॉर चेंज’ संस्थेच्या देश-विदेशांतील विद्यार्थ्यांनी दिला.

पाचगणी येथील इनीशेटिव्ह फॉर चेंजचे सुरेश खत्री, लखनऊचे हिमांशू भारत, ओरिसाची झुनी दास, श्रीलंकेचा शशिका डिसिल्वा, श्रीलंकेचीच विमर्शना, लेबनानचा महम्मद आणि रे दान यांनी गुरुवार, २२ जानेवारीला शासकीय अध्यापक महाविद्यालयात भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉ. नितीन कोंडे, डॉ. मनीषा देशमुख, डॉ. नीरज सातपुते, भाग्यश्री पाटील होत्या. प्रारंभी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या सुनंदा रोडगे होत्या. संस्थेमार्फत जागतिक पातळीवर ५० देशांमध्ये ‘परिवर्तनाचे पाऊल’ हा उपक्रम राबविण्‍यात येत आहे.

उपक्रमराबवण्यात येत असून, भारत त्यातील सक्रिय केंद्र आहे. यामध्ये क्षमता वृद्धी, सकारात्मक बदल घडवणे हा मुख्य उद्देश आहे. कृषी विद्यापीठातील काही लोकांनी या संस्थेला भेट देऊन प्रशिक्षण घेतले असून, त्याअंतर्गत ते कृषी विद्यापीठात आले असता त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांनी हिंदी गीत ‘सूरज, धरती, चाँद, गगन हऔ सबके’ हे गीत सादर केले. त्यानंतर ‘दुनिया की हालत हऔ बेहाल, कौन हऔ जिम्मेदार?’ या गीतातून त्यांनी सद्य:परिस्थितीचे चित्र रेखाटतच आजच्या अव्यवस्थेला आपण सर्वजण जबाबदार असल्याचे सांगितले. त्यानंतर मार्गदर्शन करताना सुरेश खत्री यांनी तुम्ही भावी शिक्षक असून नवी पिढी घडवणार आहात, त्यामुळे तुम्ही स्वत:ला बदला. त्यासाठी संपूर्ण पवित्रता, पूर्ण प्रामाणिकता, संपूर्ण नि:स्वार्थता आणि संपूर्ण प्रेम ही चार सूत्रे अंगीकारा. त्यानंतर प्रत्येकाने आपले अनुभव कथन करून आपल्यात कसे सकारात्मक बदल घडवले, यावर प्रकाश टाकला. लेबनानचा रे दान याने अरेबियन गीत सादर केले, तर श्रीलंकेच्या विमर्शना हिने तिच्या बोलीभाषेतील गीतावर सर्वांना नृत्य करण्यास भाग पाडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिलाष वाजपेयी यांनी केले.

ओरिसाच्या झुनी दासचा आगळा-वेगळा प्रयोग
झुनीदासने फ्लॉवरपॉट घेऊन सांगितले की, या फुलांसारखी होती. मात्र, खोलात गेल्यावर मला माझे स्वरूप कळले, असे सांगून फ्लॉवरपॉटमधील मिरची म्हणजे आपल्यास राग, द्वेष असतो. रबरावरून आयुष्यात छोट्या-छोट्या गोष्टी कशा ताणतो, तर खोडरबरावरून स्वप्ने कशी पुसतो, दगडावरून काहीजणांशी कसे कठोर वागतो, हे तिने स्पष्ट केले.

देश-विदेशांतील विद्यार्थ्यांनी शासकीय अध्यापक महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधून सकारात्मक बदल घडवण्याचे आवाहन केले.