अकोला- अनोळखी दुचाकीस्वार थैलीतून घेऊन जात असलेल्या श्रुंगी घुबडाची वन विभाग सर्पमित्रांच्या पुढाकाराने सुखरूप सुटका झाली. गोरक्षण मार्गावर बुधवारी सप्टेंबरला रात्रीस ही घटना घडली.
गोरक्षण मार्गावरील खंडेलवाल कॉन्व्हेंटनजीक दोन अनोळखी युवक दुचाकीवरून थैलीतून श्रुंगी घुबड घेऊन जात होते, मात्र वाटेत ते अचानक थैलीतून पडले. घुबड थैलीतून पडताच युवकांनी दुचाकीवरून पळ काढला. शेजारीच महालक्ष्मी महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू होता. तेथील नागरिकांनी ते घुबड पाहिले. त्यातील सेवानिवृत्त सहायक वनसंरक्षक ताथोड यांनी त्या घुबडाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी अकोला वन विभागाचे सहायक वनसंरक्षक जयंत तऱ्हाळे यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी चव्हाण यांना सूचना केली. त्यानंतर सर्पमित्र शेख महम्मद उर्फ मुन्ना वनमजूर गजानन म्हातारमारे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी श्रुंगी घुबड ताब्यात घेऊन वन विभागाचे कार्यालय गाठले. सदर घुबडाचे एक पंख जखमी असून, ते युवक हे घुबड थैलीतून नेमके कशासाठी घेऊन चालले होते? हे कळू शकले नाही. त्या घुबडावर उपचार करून त्याची जंगल परिसरात सुटका करण्यात येणार आहे.
असेआहे श्रुंगी घुबड :
श्रुंगीघुबडाला इंग्रजीत युरेशियन इगल आऊल असे संबोधत असून, त्याचे शास्त्रीय नाव बुबो बुबो असे आहे. या पक्ष्याच्या पाठीचा पंखांचा रंग गडद कथ्था असतो. पोटाकडील रंग पिवळसर असतो. छाती पोटावर काळपट रंगाच्या उभ्या रेषा असतात. या पक्ष्याच्या डोक्यावर शिंग असल्याचा भास होईल, अशा पद्धतीची िपसे असतात. एकएकट्याने िकंवा जोडीने राहणारा हा पक्षी जंगलाबरोबरच शेतीच्या परिसरात, डोंगराळ प्रदेशात आढळून येतो. मोठ्या आकाराचे घुबड हे पूर्णत: िनशाचार आहे. छोटे सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी क्वचित मोठे कीटक, मासे, खेकडेसुद्धा खातो. सुरक्षित ठिकाणी जमिनीवर किंवा डोंगर कपारीत हा पक्षी
आपले घरटे बांधतो. जखमी अवस्थेत आढळलेले श्रुंगी घुबड.