आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय शेतकरी परिसंवादाचा समाराेप; शेतकऱ्यांनी जाणून घेतल्या परस्परांच्या ववििध समस्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शेतकऱ्यांचाआत्महत्येचा प्रश्न नुसता एका देशाचा नाही, तर ते जागतिक स्तरावरील संकट आहे. यावर नुसत्या चर्चा करण्यापेक्षा सर्व देशांनी एकत्र येऊन यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. सकारात्मक दृष्टिकोनातूनच शेतकऱ्यांचा विकास शक्य आहे, असा सूर शेतकऱ्यांच्या खुल्या चर्चासत्रात उमटला. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय शेतकरी परिसंवादाच्या शेवटच्या दविशी, डिसेंबर रोजी स्व. डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात शेतकऱ्यांसाठी खुले चर्चासत्र झाले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, फार्मर्स डायलॉग इंटरनॅशनल, डॉ. पंजाबराव देशमुख अॅग्रिकल्चरल फाउंडेशन आणि सर रतन टाटा ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शेतीतील महिलांचे सक्षमीकरण फायदेशीर तंत्रज्ञान’ या विषयावर चार दविसीय आंतरराष्ट्रीय शेतकरी परिसंवाद झाले. परिसंवादाच्या शेवटच्या दविशी झालेल्या खुल्या चर्चासत्रात भारतीय परदेशातील शेतकऱ्यांनी एकमेकांच्या समस्या जाणून घेत त्यावर चर्चा केली. ज्या वर्षी उत्पादन जास्त होते त्या वर्षी शेतीमालाला कमी भाव मिळतो, तर कमी उत्पादन झाल्यास भाव जास्त मिळतो, ही परिस्थिती सगळीकडे समान आहे. पण, यावर रडत बसण्यापेक्षा यावर तोडगा काढता यावा. शेतीतील उत्पादन वाढण्यासोबतच त्याला योग्य भाव मिळण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे. केनियामध्ये शेतीमालाच्या किमती सरकार ठरवत असल्याने फायदा होतो.
फ्रान्समध्ये काही व्यावसायिक संघटना आहेत, ज्या शेतकऱ्यांशी निगडित समस्यांवर कार्य करत आहे. देशात सेंद्रिय शेती होण्यासाठी बराच वेळ लागेल. ते सहज शक्य नाही. सगळ्या लोकांची अन्नाची गरज पूर्ण करायची असेल तर सर्व शेतकऱ्यांना एकत्र घेऊन चालावे लागणार आहे. सेंद्रिय शेती किंवा कोणत्याही प्रकारची शेती करणाऱ्या शेतकऱ्याला वगळता येणार नाही. शेतकऱ्यांनी खचून जाण्यापेक्षा एकमेकांना प्रोत्साहन दिले पाहजिे. सर्व समस्येतून एकत्रितपणे तोडगा काढणे शक्य आहे, असा विचार पुढे आला. शेतकरी आत्महत्या, आर्थिक सुरक्षितता, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या परविाराचे समुपदेशन, विचार मंच, शासनाच्या योजना, बी-बियाणे अशा ववििध मुद्द्यांभोवती चर्चा फिरली.
सर्व चर्चासत्राचा सार : तीनदविसांपासून झालेल्या चर्चासत्रात चर्चिले गेलेले विषय, शोधनिबंध, समस्या आणि त्यावरील उपाय याच्या सारांशावर सायंकाळी तांत्रिक सत्रात चर्चा झाली.
सर्व विदेशी पाहुण्यांचा सत्कार : चर्चासत्राच्याप्रारंभी सर्व विदेशी पाहुण्यांचे शाल, श्रीफळ, पुष्पहाराने स्वागत झाले. भारतीय संस्कृतीतील स्वागत करण्याच्या पद्धतीने ते सर्व भारावून गेले.
प्रयोगांच्या भेटी
बोरगावमंजूयेथील कौसर आवळा प्रकल्पाची विदेशी शेतकरी प्रतिनिधींनी माहिती घेतली. यात त्यांनी आवळ्यापासून तयार होणारे ववििध पदार्थ, प्रक्रिया जाणून घेतल्या तसेच हळदीच्या प्रकल्पाचीदेखील माहिती घेतली.