आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिमझिम धारांत साधला ‘योग’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- पहाटेचे कोवळे, आल्हाददायी वातावरण, पावसाची रिपरिप अन् आसमंतात गुंजणारा ओमकारचा नाद, असा योग आज २१ जूनला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील पदवीदान सभागृहात घडून आला. जागतिक योग दिनानिमित्त आयोजित मुख्य सोहळ्यात हजार ४८७ अकोलेकरांनी योगाभ्यास करीत आरोग्य जागर केला.
पावसाचे दिवस पाहता अकोल्यातील सर्वात मोठे सभागृह म्हणून कृषी विद्यापीठातील पदवीदान समारंभ सभागृहाची निवड करण्यात आली होती. सुरुवातीला खासदार संजय धोत्रे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, डॉ. प्रदीप इंगोले, कृषी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. व्ही. एम. फाले, उपजिल्हाधिकारी प्रमोद दुबे, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, शरद कोकाटे, दयाराम मेतकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, डॉ. ज्ञानेश भारती, शिक्षणाधिकारी अशोक सोनवणे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाने, प्रकाश अंधारे, दीपक मायी, नेहरू युवा केंद्राचे हरिहर जिराफे, अजिंक्यचे धनंजय भगत आदी व्यासपीठावर होते.
पतंजलीचे मुख्य प्रशिक्षक सुहास काटे भारती शेंडे यांनी कार्यक्रमाचे संचालन करीत उपस्थितांकडून योगाभ्यास करवून घेतला. त्यांना योगशिक्षक माधव मुन्शी, दीपक जसवानी यांचे सहकार्य लाभले.‘इतनी शक्ती हमे देना दाता’ या प्रार्थनेने सांगता करण्यात आली.
सांगतेनंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले, तर खासदार संजय धोत्रे यांनी आपल्या भाषणातून सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी श्याम देशपांडे यांनी केले. खासदार संजय धोत्रे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने साेहळ्याला प्रारंभ करण्यात आला.
अद्भुत ‘योग’
- भारतीयांची हजार वर्षे जुनी परंपरा एका द्रष्ट्या राजकारण्याने जगासमोर मांडून १९० देशांची मान्यता मिळवली अन् आज एकाच वेळी जगभरात योगाभ्यास झाला हा अद््भुत योगच म्हणावा लागेल. यापूर्वी भारताने ‘हँडवॉश’ म्हणजे जेवणापूर्वी हात धुण्याची आरोग्यदायी शिकवण जगाला दिली आहे. तसेच मदन कटारिया यांनी ‘हास्ययोग’ जगाला शिकवला आहे. योग दिनाच्या निमित्ताने भर पावसात हजारो अकोलेकर एकत्र आले अन् त्यांनी योग साधला. डॉक्टर या नात्याने मी सांगेन की, औषधांबरोबर प्रत्येकाने सहजपणे प्राणायाम ध्यान केल्यास जीवन निरामय, निरोगी करण्यास निश्चित मदत होईल.''
डॉ.नानासाहेब चौधरी
असा होता क्रम...
सर्वप्रथम प्रणव गान तीनदा ओम््चे उच्चारण करण्यात आले. त्यानंतर ‘ओम् संगच्छध्वं संवदध्वं, सं वो मनांसि जानताम् देवा भागं यथा पूर्वे, सज्जानाना उपासते’ ही प्रार्थना झाली. त्यानंतर उपस्थितांनी शिथिलीकरणाचा अभ्यास, ग्रीवा चालन, कटीचालन, गुडघा संचालन झाले. त्यानंतर उभ्याने करण्यात येणारी पाच आसने ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन करण्यात आले.
पाठीवर झोपून सेतुबंधासन, पवनमुक्तासन, शवासन ही आसने केली. त्यानंतर कपालभाती, अनुलोम-विलोम, भ्रामरी हे प्राणायाम झाले. मिनिट ध्यान करण्यात आले. त्यानंतर संकल्प पाठ घेण्यात आला. ‘ओम सर्वे भवन्तु सुखिन:’ हा शांतीपाठ अन् इतनी शक्ती हमे देना दाता या प्रार्थनेने सांगता झाली.
बातम्या आणखी आहेत...