आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Invalid Pipe Connection,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अवैध नळजोडणी प्रकरणात 30 जणांविरुद्ध फौजदारीची तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अवैध नळजोडणी प्रकरणात डॉ. एस.एम.अग्रवाल, डॉ.उदय नाईक हॉस्पिटलसह 30 जणांवर पाणी चोरीप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे आता अवैध नळजोडणीधारकांना दंडात्मक कारवाईचा नाही तर फौजदारी खटल्याचा सामना करावा लागणार आहे. 76 हजार मालमत्तांची नोंद असताना नळधारकांची संख्या मात्र 32 हजार आहे. त्यामुळे हजारो नळजोडण्या अवैध असल्याची बाब स्पष्ट होते. अवैध नळजोडण्यामुळे महापालिकेला महसुलापासून वंचित राहावे लागत असून, पाणीपट्टीचा भरणा करणार्‍यांना मात्र पाण्यासाठी भटकंती करावी लागते तर दुसरीकडे महापालिकेला ही योजना तोट्यात चालवावी लागत आहे.
या अनुषंगानेच अवैध नळजोडण्या शोधमोहीम प्रशासनाने सुरू केली. यासाठी पाच पथके कार्यान्वित करण्यात आली. परंतु, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी कर्मचार्‍यांना दंडात्मक कारवाई बंद करून अवैध नळजोडणीधारकांवर फौजदारी दाखल करण्याचे आदेश दिले.
उपायुक्तांच्या या आदेशान्वये कर्मचार्‍यांनी शहराच्या विविध भागांत एकूण 30 जणांवर अवैध नळजोडणी प्रकरणात दंडात्मक कारवाईऐवजी मनपा अधिनियम कलम 194-2 (अ), भारतीय दंड विधान संहिता कलम 277 तसेच भा.द.वि.स. कलम 378, 425, 430, 432, 264, 269 अन्वये तक्रार दाखल केली. या कलमामुळे चोरीच्या गुन्ह्याची शिक्षा लागू शकते.
प्रतिष्ठितांविरुद्ध झाल्या तक्रारी दाखल
डॉ.एस.एम.अग्रवाल, डॉ.उदय नाईक हॉस्पिटल, खान्देश डेअरी, हॉटेल बहार, गणेश स्वीट मार्ट, सूर्यकांत डहाळे, गोपाल गंद्रे, राजेश्वर राठोड, हरिदास देवीकर, मुक्ताबाई राजाराम डोंगरे, शेख महेबूब महंमद युनूस, शेख रसुल शेख दिवाण, जमिर बेग, महंमद अनिस अब्दुल जब्बार, गुलाम जिलानी, अब्दुल काहर गुलाम युनूस, शेख महेबूब शेख रहिमोद्दीन, शेख इसमोद्दीन, शेख फईम, सय्यद इब्राहिम सय्यद अली, महेंद्र पांडे, सुरजकली शर्मा, विजयसिंह लहरिया, देवराव पातोंडे, रामेश्वर डोंगरे, तुळशीराम कड, राजा ठाकूर, मंदाताई लक्ष्मण पळोचे, हेमलता भगत यांच्याविरु द्ध महापालिका अधिनियम कलम 194-2 (अ), भारतीय दंड विधान संहिता कलम 277 तसेच भादविसच्या कलम 378, 425, 430, 432, 264 अन्वये विविध पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत.