आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Irrigation Sector Development Stope Due To Corporation Ignorance

महामंडळाच्या दुर्लक्षामुळे विदर्भातील सिंचनक्षेत्र विकास रखडला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - विदर्भ सिंचन महामंडळाच्या दुर्लक्षित कारभारामुळे गेल्या दहा वर्षात केलेल्या नियोजनातील 142 पैकी केवळ 45 प्रकल्पांचे काम मार्गी लागले असून या माध्यमातून उद्दीष्टापैकी केवळ 1.4 टक्के एवढीच जमिन ओलिताखाली आल्याचे धक्कादायक वास्तव विदर्भ आर्थिक विकास समिती (वेद) व लोकनायक बापूजी अणे स्मारक समिती यांच्या वतीने दाखल केलेल्या जनहित याचिकेव्दारे उघड झाले आहे. संबंधित संस्थांनी या मागच्या कारणांचा शोध घेण्यासाठी दाखल केलेल्या या याचिकेच्या सुनावणीवर सिंचन महामंडळाने थेट सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता स्थगनादेश मिळवला असून येत्या 22 जानेवारी रोजी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे.
मागासलेपणाचा शिक्का माथी बसलेल्या विदर्भाचा सर्वांगिण विकास हा सिंचनाच्या माध्यमातून होऊ शकतो, या धारणेतून शासनाने विदर्भ सिंचन महामंडळाची स्थापणा केली आहे. मात्र, या महामंडळाचे काम कासवगतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. महामंडळाने मागील दहा वर्षात एकूण 142 सिंचन प्रकल्प बांधण्याचे नियोजन केले. त्या माध्यमातून विदर्भातील 11 लाख 14 हजार 723 हेक्टर जमिन ओलिताखाली आणण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात 142 पैकी 45 सिंचन प्रकल्पांच्या कामाला केंद्राची अंतीम अनुमती मिळाल्याने पूर्ण होवू शकले. या माध्यमातूनही दहा वर्षात 5 लाख 46 हजार 298 हेक्टर जमिन ओलिताखाली येणार होती. मात्र प्रत्यक्षात केवळ 13 हजार 207 हेक्टर क्षेत्रच म्हणजे 2.38 टक्के जमिनच सिंचनाखाली आलेली आहे. महामंडळाच्या नियोजित 33 प्रकल्पांना शासनाची तत्वत: मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पाद्वारे 4 लाख 56 हजार 185 हेक्टर जमिन ओलिताखाली येणार आहे.
दरम्यान, विदर्भातील सिंचनाच्या वास्तवावर प्रकाशझोत टाकणार्‍या वेद व लोकनायक बापूजी अणे समितीची जनहित याचिका सुनावणीसाठीच येवू नये असा प्रयत्न सिंचन महामंडळाने केला. मात्र नागपूर उच्च न्यायालयाने तो फेटाळून लावल्याने त्यांनी यावर सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता मनाई आदेश आणला आहे. त्यावर, येत्या 22 जानेवारी रोजी पुन्हा सुनावणी होणार असल्याची माहिती बापूजी अणे स्मारक समितीचे संयोजक अँड. अविनाश काळे यांनी दिली आहे.