अकोला -
इस्रायल हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी जमाअते इस्लामी हिंद संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत दिवसभर धरणे दिले. गाझा पट्टीवर इस्रायलकडून झालेला आतंकी हल्ला मानवीय अधिकारांचे हनन आहे. महिला, मुले आतंकी अमानवीय अत्याचारामध्ये दरडल्या जात आहेत. या हल्ल्यावर त्वरित प्रतिबंध घालण्यात यावा, अशी मागणी जमाअते इस्लामी हिंद अकोला संघटनेतर्फे करण्यात आली आहे. जमाअते इस्लामी हिंद संघटनेचे अध्यक्ष हामिद हुसेन, इरफान सर, वजीर खान साहब, अलताफ खान, रियाज खान यांच्या नेतृत्वात दुपारी 2 ते 4 पर्यंत इस्रायलच्या आतंकी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. याबाबत संघटनेतर्फे जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
मुले व महिलाही झाल्या सहभागी
आंदोलनामध्ये लहान मुले व महिला, युवतीही सहभागी झाल्या होत्या. इस्रायलच्या आतंकी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. या वेळी पोस्टर्स, बॅनर्सद्वारे इस्रायलच्या कारनाम्यांची माहिती दर्शवण्यात आली.
- आंदोलनात सहभागी संघटना
- महिला संघटना जमाअते इस्लामी हिंद
- गल्र्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया
- स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया
- मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस
- युथ विंग जमाअते इस्लामी हिंद
- वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया
- प्रमुख मागण्यांचा समावेश
संयुक्त महासंघाने मूकबधिरच्या भूमिकेचा त्याग करून अमानवीय अत्याचाराला प्रतिबंध घालण्यास पुढाकार घ्यावा.
अमेरिकेने इस्रायल प्रेमात आंधळे न होता न्यायाची भूमिका घ्यावी, मानवीय अधिकाराचे रक्षण करावे.
भारताने अत्याचाराविरोधात प्रभावी भूमिका घेत मानव धर्माचे पालन करावे.
भारतीय मीडियाने वास्तविकतेचा अभ्यास करून न्यायिक भूमिका स्वीकारून देशाची परंपरा कायम राखावी.