आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jaikumar Nair Says Dance Reality Show Is Big Platform

डान्स रिअँलिटी शो आहे उत्तम व्यासपीठ - ‘डान्सिंग स्टार’ जयकुमार नायर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - डान्स रिअँलिटी शोमुळे नवोदित कलावंतांना योग्य संधी मिळत असून, त्यांना या क्षेत्रात वाव आहे. रिअँलिटी शो कलावंतांसाठी उत्तम व्यासपीठ आहे, असे मत ‘डान्सिंग स्टार’ जयकुमार नायर यांनी बुधवारी एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.

झी अनमोल वाहिनीवरील डीआयडी सीझन एकच्या प्रमोशनसाठी जयकुमार नायर येथे आले होते. झी एन्टरप्राईजेसने झी अनमोल वाहिनीची सुरुवात केली आहे. मोबाइल आणि टेलिव्हिजनच्या माध्यमातून सक्रिय होणारी झी अनमोल ही देशातील पहिली वाहिनी आहे.

डान्स इंडिया डान्सच्या पहिल्या पर्वाचा समावेश झी अनमोलवर करण्यात आला आहे. शो आणि वाहिनीसंदर्भात अधिक माहिती देताना जयकुमार नायर यांनी डान्स इंडिया डान्स हा एक अनोखा शो असून, याच्या माध्यमातून देशात डान्सकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्याचा फायदा या क्षेत्रात नव्याने संधी शोधणार्‍यांना होणार आहे, असे त्यांनी सांगितले. या वेळी झी टीव्हीचे अनुज तालपाडे उपस्थित होते.