आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनींचे विनयभंग प्रकरण - दोन्ही आरोपी शिक्षकांच्या जामीनावर आज निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जवाहरनवोदय विद्यालयातील दोन्ही आरोपी शिक्षकांच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली. या सुनावणीवरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला असून, शुक्रवारी या दोन्ही शिक्षकांच्या जामीन अर्जावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

मुलींच्या विनयभंगप्रकरणी नवोदय विद्यालयातील तीन शिक्षकांवर िवनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या तीनही शिक्षकांची पोलिस कोठडी संपल्याने तिघेही आता न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यापैकी संदीप लाडखेडकर यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला, तर आरोपी राजन गजभिये आणि शैलेश रामटेके या दोघांच्याही वतीने प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही. एन. तांबी यांच्या न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली.
या वेळी आरोपीचे वकील संजय उपर्वट यांनी आरोपीने तपासकार्यात केलेल्या सहकार्यांचा उल्लेख करत आरोपींना जामीन देण्याची विनंती केली. यावर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला असून, शुक्रवारी त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणात नवोदय विद्यालयाचे प्राचार्य यांना दोषी ठरवून शाळा प्रशासनाने त्यांची बदली केली असून, दोन दिवसांपूर्वी मुलींच्या वसतिगृहाच्या अधीक्षिका आणि उपप्राचार्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.