आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jayasvalam To The Arrest Of Movements Action Excise Department

जयस्वालांच्या अटकेच्या हालचाली- उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-इंदूर येथून आलेल्या 14 हजार लिटर स्पिरिट प्रकरणात येथील मद्यनिर्माता राजू जयस्वाल व त्यांचे साथीदार अभय नंद यांच्या अटकेसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी कंबर कसली आहे. यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी फिल्डिंग लावली असून, लवकर त्यांना याप्रकरणी अटक होईल, असा विश्वास विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केला.
मागील वर्षी 25 डिसेंबरला मूर्तिजापूर येथे 14 हजार लिटर स्पिरिट जप्त केले होते. यात स्पिरिटसह जप्त केलेला टँकर व स्पिरिट घेण्यासाठी आलेले वाहन ( एम.पी.07 सीबी 5877) तसेच त्याचा दावा करणारे कर्मचारी राजू जयस्वाल यांच्या सेव्हन स्टार या कंपनीशी निगडित असल्याचे तपास यंत्रणेला आढळले होते. त्यामुळे स्पिरिट तस्करीच्या या प्रकरणाचा थेट संबंध येथील सेव्हन स्टारचे मालक राजू जयस्वाल यांच्याशी असल्याचे तपास यंत्रणेचे मत आहे. या सर्व प्रकरणात शासनाचा सुमारे दीड ते पावणे दोन कोटींचा महसूल बुडवण्याचा उद्देश उघड झाल्याचा दावा तपास यंत्रणेतील सूत्रांनी व्यक्त केला आहे.
राजू जयस्वाल यांचा अटकपूर्व जामीन अलीकडेच येथील सत्र न्यायालयाने रद्द केल्याने त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केली.
सीएल ‘तीन’ अडचणी ‘दुप्पट’
दारूच्या उत्पादन, होलसेल आणि रिटेलसंदर्भात अनुक्रमे सीएल वन, सीएल टू, सीएल थ्री, असे लायसन्स दिले जातात. हे तिन्ही लायसन्स मद्यनिर्माता राजू जयस्वाल यांच्याकडे आहेत. त्यामुळे त्यांनी शासनाचा महसूल बुडवल्याचा संशय राज्य उत्पादन शुल्क विभागाला आहे. शासनाचा नेमका किती महसूल बुडाला याचा तपास होत आहे. मद्यनिर्मितीच्या ठिकाणी असलेल्या अधिकार्‍यांची भूमिका यात कशी होती, या दृष्टीने यंत्रणा तपास करत आहे. या प्रकरणात मोठा खुलासा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.