अकोला - जेईई परीक्षेमध्ये अकोला येथील कपिल वैद्यने महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावला. त्याला या परीक्षेत 360 पैकी 335 गुण मिळाले. गणितात 120, फिजिक्समध्ये 105 आणि केमिस्ट्रीमध्ये 110 गुण मिळाले.
औरंगाबादेत सुशील वर्मा पहिला : जेईई मुख्य परीक्षेत औरंगाबाद शहरातून सुशील वर्मा याने सर्वाधिक 315 गुण मिळवले. अभियांत्रिकीमध्ये नामवंत महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी ही प्रवेश पूर्वपरीक्षा होते. मराठवाड्यातून परीक्षेसाठी 28 हजार, तर जिल्ह्यातून 8,845 विद्यार्थी बसले होते. देशभरातील 13 लाख 56 हजार 800 विद्यार्थ्यांपैकी जवळपास दीड लाख विद्यार्थी जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र ठरले. बारावी व जेईई मेन्समधील गुण मिळून गुणवत्ता यादी ठरणार आहे.