अकोला - जेईईत देशात पहिला आल्याचा दावा करणारा बुलडाणा जिल्ह्यातील आशिष गवई या परीक्षेत नापास असल्याचा दावा एका कोचिंग क्लास संचालकाने पुराव्यांसह केला. साखरखेर्डा येथील आशिषने ३६० पैकी ३४६ गुण घेतल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात त्याला ११ गुण आहेत.
पेपर कठीण असताना आशिषचे अभ्यासाचे तंत्र समजून घेण्यासाठी अकोल्यातील सरस्वती कोचिंग क्लासेसचे संचालक प्रशांत देशमुख यांनी त्याची भेट घेतली होती.
असे फुटले बिंग
आशिष प्रथम आल्याच्या ई-मेलची कॉपी त्याच्या वडिलांनी देशमुख यांना दिली. मात्र, त्यांच्याकडे गुणपत्रिका नव्हती. आशिषच्या जन्मतारखेवरून त्याचा जेईईचा अर्ज काढला. त्यावरून मार्कलिस्ट हाती लागली व त्याला ११च गुण असल्याचे उघड झाले. देशमुख यांनी मार्कलिस्ट पत्रकारांना दिली.