आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jhulelal Festival News In Marathi, Kids Performs Fansi Dress Competition, Divya Marathi

झुलेलाल महोत्सव : चिमुकल्यांनी केलेल्या विविध वेशभूषेने जिंकली मने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- सिंधी कॅम्प येथील संत कंवरराम प्रतिमा प्रांगण येथे शनिवार, 29 मार्चला आयोजित विविध वेशभूषा स्पर्धा (फॅन्सी ड्रेस)मध्ये अनेकविध प्रकार सादर केले. चिमुकल्यांच्या विविधांगी वेशभूषेने उपस्थितांची मने जिंकली. पूज्य सिंधी जनरल पंचायतअंतर्गत झुलेलाल महोत्सव समितीतर्फे सुरू असलेल्या झुलेलाल महोत्सवात याचे आयोजन करण्यात आले. झुलेलाल महिला मंडळ, संत निरंकारी महिला मंडळ, एसएसडी धाम महिला मंडळ यांनी महोत्सवात सहकार्य केले.

वेशभूषा स्पर्धेमध्ये काही चिमुकल्यांनी अरविंद केजरीवाल, राहुल गांधी यांची वेशभूषा करून ठसा उमटवला. शुभम जसवानी याने साकारलेल्या नरेंद्र मोदींच्या वेशभूषेला वाहवा मिळाली. वर्तमानपत्राची वेशभूषा करणारी अर्पिता सतवानीने विशेष दाद मिळवली. स्पर्धेमध्ये काहींनी गाणी म्हटली, तर काहींनी नृत्य केले. यात जवळपास 120 चिमुकल्यांनी सहभाग घेतला. याशिवाय डॉ. अर्चना गुप्ता यांच्या मार्गदर्शनात झालेले समूहनृत्य आकर्षक ठरले. अश्विन आयदासानी, डॉ. विकास विरवानी, सोनल मोहनदासानी, सोना धनवानी, रश्मी केसवानी, कोमल हिरानंदानी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. रविवारी आनंद मेळावा, प्रदर्शन आणि बेस्ट सिंधी कपल स्पर्धेसह हरदासराम भवनात रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. सोमवारी टॅलेंट हंट स्पर्धा तसेच महिलांसाठी रांगोळी स्पर्धा होणार आहे. 1 एप्रिलला महोत्सवाचे मुख्य आकर्षण चेट्रीचंडनिमित्त संत कंवरराम प्रतिमा प्रांगण येथून मिरवणूक काढली जाईल. या मिरवणुकीचे निमवाडी येथे विसर्जन होणार आहे. या वेळी महापूजा, बहराणा साहब व अखंड ज्योत प्रज्वलन होणार आहे. महोत्सवात आमदार गोवर्धन शर्मा, हरीश आलिमचंदानी, हिरालाल कृपलानी, गोपी धनवानी, ब्रrानंद वलेचा, रमेश जग्यासी, गौतम वाधवानी, मनोहर पंजवानी आदींसह समितीतील पदाधिकारी उपस्थित होते.